दि.१० मार्च - वाशिम जिल्ह्यातील सर्व खाजगी आस्थापनाधारकांनी २१ मार्च पर्यंत कोरोना चाचणी करून घेणे बंधनकारक. All private establishments are required to test the corona by March 21

Washim district map


वाशिम जिल्ह्यातील सर्व खाजगी आस्थापनाधारकांनी २१ मार्च पर्यंत कोरोना चाचणी करून घेणे बंधनकारक

चाचणी न केल्यास २२ मार्च पासून आस्थापना सुरु करण्यास मनाई

वाशिम, दि. १० (जिमाका) : जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसार्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या असून याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व खाजगी आस्थापनाधारकांची कोरोना चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. सर्व खाजगी आस्थापनाधारकांनी ११ मार्च ते २१ मार्च या कालावधीत आपली तसेच आस्थापनेत कार्यरत कामगारांची कोरोना चाचणी करून घ्यावी, अन्यथा २२ मार्चपासून संबंधित आस्थापना बंद ठेवावी लागणार आहे. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज, १० मार्च रोजी निर्गमित केले आहेत.

या आदेशानुसार जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व दुकानदार, भाजीपाला, फळे, दुध विक्रेते, सलून, जनरल स्टोअर, डेअरी, कापड दुकान, मेडिकल, पीठ गिरणी, किराणा दुकानदार, हॉटेल, बार, रेस्टॉरंट लॉज यासह इतर सर्व खाजगी आस्थापनाधारक व या आस्थापनांमध्ये काम करणारे कामगार यांची कोरोना चाचणी ११ मार्च ते २१ मार्च या कालावधीत करणे बंधनकारक आहे. या आदेशाचे भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे, असे मानण्यात येईल व अशा व्यक्ती, संस्था, संघटना, यांचेवर गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही, अशा अधिकाऱ्यास यापूर्वी निर्गमित केलेल्या आदेशानुसार पुढील आदेशापर्यंत प्राधिकृत करण्यात असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

येथे करता येणार कोरोना चाचणी

वाशिम येथील जिल्हा स्त्री रुग्णालय, अनुसूचित जाती मुलींचे वसतिगृह, कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालय व तुळजा भवानी मंगल कार्यालय यासह रिसोड, मालेगाव, मानोरा, मंगरूळपी, कामरगाव व अनसिंग येथील ग्रामीण रुग्णालये, तुळजापूर (ता. मंगरूळपीर) येथील अनुसूचित जाती मुलांचे वसतिगृह, सवड (ता. रिसोड) येथील अनुसूचित जाती मुलांचे वसतिगृह आणि जिल्ह्यातील सर्व २५ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध आहे.

Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

एक टिप्पणी भेजें

साप्ताहिक जनता परिषद अंक - ४३ वर्ष - ४४ दिनांक - २४ नोव्हेंबर २०२२ Janta Parishad E-43 Y-44 24-11-2022

  साप्ताहिक जनता परिषद अंक - ४३     वर्ष - ४४    दिनांक - २४ नोव्हेंबर २०२२    Weekly Janta Parishad    Edition : 43      Year : 44     Date...