Header Ads

वाशिम जिल्ह्यातील २४६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांवर महिला आरक्षण निश्चित - Women's reservation for Sarpanch posts of 246 Gram Panchayats in Washim district

वाशिम जिल्ह्यातील २४६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांवर महिला आरक्षण निश्चित

Women's reservation for Sarpanch posts of 246 Gram Panchayats in Washim district 

वाशिम, दि. ०४ (जिमाका) : सन २०२० ते २०२५ दरम्यान सार्वत्रिक निवडणुकीद्वारे गठीत होणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाकरिता महिला आरक्षण सोडत आज, ४ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन इमारतीमध्ये झाली.या सोडतीद्वारे जिल्ह्यातील एकूण ४९० ग्रामपंचायतींपैकी २४६ ग्रामपंचायतींचे सरपंच पद महिलांसाठी आरक्षित करण्यात आले. यापैकी अनुसूचित जातीमधील महिलांसाठी ५०, अनुसूचित जमातीमधील महिलांसाठी २०, नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी ६६ आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी ११० ग्रामपंचायतींचे सरपंच पद आरक्षित झाले आहे.

या आरक्षण सोडतीवेळी सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, उपजिल्हाधिकारी (महसूल) सुनील विंचनकर, तहसीलदार शीतल वाणी-सोलट, वाशिमचे तहसीलदार विजय साळवे, रिसोडचे तहसीलदार अजित शेलार, कारंजाचे तहसीलदार धीरज मांजरे, मालेगावचे प्रभारी तहसीलदार रवी राठोड, मंगरूळपीर तहसील कार्यालयाचे नायब तहसीलदार सागर कुलकर्णी, मानोराचे नायब तहसीलदार श्री. किर्दक यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.

वाशिम तालुका -  ८४  ग्रामपंचायत 

Washim Taluka - 84 Gram Panchayats

वाशिम तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतींपैकी ४२ ग्रामपंचायतींचे सरपंच पद महिलांसाठी आरक्षित झाले असून यामध्ये अनुसूचित जाती महिलांसाठी १०, अनुसूचित जमाती महिलांसाठी २, नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी ११ आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी १९ ग्रामपंचायतींमध्ये आरक्षण निश्चित झाले आहे. 

रिसोड  तालुका -  ८०  ग्रामपंचायत 

Risod Taluka - 80 Gram Panchayats

रिसोड तालुक्यातील ८० ग्रामपंचायतींपैकी ४० ग्रामपंचायतींचे सरपंच पद महिलांसाठी आरक्षित झाले असून यामध्ये अनुसूचित जाती महिलांसाठी ९, अनुसूचित जमाती महिलांसाठी २, नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी ११ आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी १८ ग्रामपंचायतींमध्ये आरक्षण निश्चित झाले आहे.

मालेगाव  तालुका -  ८३  ग्रामपंचायत 

Malegaon Taluka - 83 Gram Panchayats

मालेगाव तालुक्यातील ८३ ग्रामपंचायतींपैकी ४२ ग्रामपंचायतींचे सरपंच पद महिलांसाठी आरक्षित झाले असून यामध्ये अनुसूचित जाती महिलांसाठी ८, अनुसूचित जमाती महिलांसाठी ७, नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी ११ आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी १६ ठिकाणी आरक्षण निश्चित करण्यात आले. 

मंगरूळपीर तालुका -  ७६ ग्रामपंचायत 

Mangrulpir Taluka - 76 Gram Panchayats

मंगरूळपीर तालुक्यातील ७६ ग्रामपंचायतींपैकी ३८ ग्रामपंचायतींचे सरपंच पद महिलांसाठी आरक्षित असून यामध्ये अनुसूचित जाती महिलांसाठी ९, अनुसूचित जमाती महिलांसाठी २, नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी १० आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी १७ ग्रामपंचायतींमध्ये आरक्षण निश्चित करण्यात आले.

कारंजा  तालुका -  ९० ग्रामपंचायत 

Karanja Taluka - 90 Gram Panchayats

कारंजा तालुक्यातील ९० पैकी ४५ ग्रामपंचायतींचे सरपंच पद महिलांसाठी आरक्षित राहणार असून यामध्ये अनुसूचित जाती महिलांसाठी ९, अनुसूचित जमाती महिलांसाठी २, नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी १२ आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी २२ ग्रामपंचायतींमध्ये आरक्षण निश्चित झाले आहे. 

मानोरा तालुका -  ७७ ग्रामपंचायत 

Manora Taluka - 77 Gram Panchayats

मानोरा तालुक्यातील ७७ ग्रामपंचायतींपैकी ३९ ग्रामपंचायतींचे सरपंच पद महिलांसाठी आरक्षित राहणार असून यामध्ये अनुसूचित जाती महिलांसाठी ५, अनुसूचित जमाती महिलांसाठी ५, नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी ११ आणि सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी १८ ठिकाणी आरक्षण निश्चित झाले आहे.

No comments

Powered by Blogger.