Header Ads

वाशिम जिल्ह्यात १ मार्चपासून शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम - Search operation for out-of-school children district

वाशिम जिल्ह्यात १ मार्चपासून शाळाबाह्य मुलांची शोध मोहीम

वाशिम, दि. २७ (जिमाका) : जिल्ह्यातील ३ ते १८ वर्षे वयोगटातील शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांचा शोध घेण्यासाठी १ ते १० मार्च २०२१ दरम्यान शोध मोहीम राबविण्यात येणार आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी २५ फेब्रुवारी रोजी जिल्हास्तरीय समितीची सभा घेवून सर्व शासकीय यंत्रणांनी सक्रियपणे व समन्वयाने काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात झालेल्या या सभेला शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रमेश तांगडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अंबादास मानकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

शाळाबाह्य  मुलांची शोध मोहीम राबविण्यासाठी जिल्हा, तालुका, केंद्र आणि गावपातळीवर  समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. याबाबत कृती आराखडा तयार करून मोहीम यशस्वीपणे पूर्ण करावी. शोध मोहिमेंतर्गत सर्व संबंधित घटकांनी सक्रीय सहभाग नोंदवून शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सामुहिक प्रयत्न करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले.

यावेळी श्री. मानकर म्हणाले, शाळाबाह्य स्थलांतरीत मुलांचा शोध घेण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, सरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, नागरिक, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांनी सहकार्य करावे. यावेळी त्यांनी मोहिमेच्या पूर्वतयारीची माहिती दिली.

No comments

Powered by Blogger.