Header Ads

दि.२७ फेब्रु - मंगरूळपीर तालुक्यातील सोनखास शिवारात बर्ड फ्ल्यूमुळे कोंबड्यांची मर्तुक -The death of chickens due to bird flu


मंगरूळपीर तालुक्यातील सोनखास शिवारात बर्ड फ्ल्यूमुळे कोंबड्यांची मर्तुक 
१ किलोमीटर परिसरातील कुक्कुट पक्षांची कलिंग करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश

वाशिम, दि. २७ (जिमाका) : मंगरूळपीर तालुक्यातील मौजे सोनखास शिवारात एव्हीएन इंफ्लूएन्झा (बर्ड फ्ल्यू)मुळे कोंबड्यांची मर्तुक झाल्याचे आढळून आले आहे. या रोगाचा प्रसार जिल्ह्यातील इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून बाधित कोंबड्या आढळलेल्या सोनखास येथील खाजगी कुक्कुट फार्म व परिसरातील कोंबड्यांचे शास्त्रोक्त पद्धतीने कलिंग करून विल्हेवाट लावण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले आहेत.

मंगरूळपीर तालुक्यातील मौजे सोनखास शिवारात कोंबड्यांची मर्तुक बर्ड फ्ल्यूमुळे झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे प्राण्यांमधील संक्रामक व सांसर्गीक रोग प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम २००९ व ACTION PLAN FOR PREVENTION, CONTROL & CONTAINMENT OF AVIAN INFLUENZA (Revised 2021) नुसार प्राप्त अधिकारातून मौजे सोनखास येथील बाधित कोंबड्या आढळलेल्या कुक्कुट फार्म या बाधित क्षेत्रापासून १ किलोमीटर परिसरातील सर्व कुक्कुट पक्ष्यांची शास्त्रोक्त पध्दतीने कलिंग करून विल्हेवाट लावण्याचे आदेश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले आहेत.


No comments

Powered by Blogger.