Header Ads

कोरोनाची लक्षणे लपवू नका, तातडीने चाचणी करून घ्या - if got symptoms get tested for corona

कोरोनाची लक्षणे लपवू नका, तातडीने चाचणी करून घ्या - जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राठोड

वाशिम, दि. २८ : कोरोना संसर्गाचे लवकर निदान व उपचार झाल्यास रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे.  त्यामुळे नागरिकांनी सर्दी, ताप, खोकला, घशामध्ये खवखवणे यासारखी कोरोना संसर्गाची लक्षणे असल्यास ती लक्षणे न लपवता तातडीने कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी केले आहे. 

जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध आहे. वाशिम शहरातील सिव्हील लाईन येथील अनुसूचित जाती मुलींचे वसतिगृह, मंगरूळपीर तालुक्यातील तुळजापूर येथील अनुसूचित जाती मुलांचे वसतिगृह, रिसोड तालुक्यातील सवड येथील अनुसूचित जाती मुलांचे वसतिगृह व कारंजा उपजिल्हा रुग्णालय येथे कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आले असून याठिकाणी सुद्धा कोरोना चाचणीची सुविधा उपलब्ध आहे, असे डॉ. राठोड यांनी सांगितले.

No comments

Powered by Blogger.