Header Ads

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस


जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस

नोंदणी झालेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी २० फेब्रुवारी पूर्वी लस घ्यावी

वाशिम, दि. १७ (जिमाका) : जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज, १७ फेब्रुवारी रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय येथील लसीकरण केंद्रात जावून कोरोन प्रतिबंधक लस टोचून घेतली. तसेच जिल्ह्यात लसीकरणासाठी नोंदणी केलेले सर्व आरोग्य, महसूल, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सुद्धा २० फेब्रुवारीपर्यंत लस घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, डॉ. उमेश मडावी, डॉ. राजेश पवार यावेळी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने सर्व हेल्थ वर्कर्स, फ्रंट लाईन वर्कर्स यांना पुन्हा एकदा या संकटावर मात करण्यासाठी सज्ज राहावे लागणार आहे. त्यामुळे सर्वांनी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेवून कोरोना संसर्गापासून आपला बचाव करणे आवश्यक आहे. कोरोना प्रतिबंधक लस ही पूर्णतः सुरक्षित आहे. जिल्ह्यात नोंदणी झालेल्या ५२ टक्केपेक्षा जास्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आतापर्यंत कोरोनाची लस घेतली आहे. यापैकी कोणालाही लसीकरणाचा गंभीर दुष्परिणाम जाणवलेला नाही. त्यामुळे कोरोना लसीकरणाबाबत संदेश प्राप्त होताच सर्वांनी नजीकच्या लसीकरण केंद्रावर जावून कोरोनाची लस घ्यावी. मनात कोणतीही भीती अथवा शंका बाळगू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.

No comments

Powered by Blogger.