सिनेमा हॉल, स्पोर्टस् कॉम्प्लेक्स बंद ठेवण्याचे आदेश. Cinema hall, sports complex closed up to next order
सिनेमा हॉल, स्पोर्टस् कॉम्प्लेक्स बंद ठेवण्याचे आदेश
वाशिम (जिमाका) दि. १८ : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून १७ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. जिल्ह्यातील सिनेमा हॉल, स्पोर्टस् कॉम्प्लेक्स बंद ठेवण्याचे आदेशही जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष षण्मुगराजन एस. यांनी आज, १८ फेब्रुवारी रोजी निर्गमित केले आहेत.
या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व स्पोर्टस् कॉम्प्लेक्स मधील सर्व इनडोअर, आऊटडोअर खेळ, योगा, स्विमिंग पूल तसेच जिम बंद राहतील. सर्व सिनेमा हॉल्स, थियटर्स, मल्टीप्लेक्स, ड्रामा थियटर्स बंद राहतील. सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी प्रशिक्षण संस्था बंद राहतील. जिल्हा ग्रंथालय ५० टक्के उपस्थितीमध्ये मास्क, सॅनिटायझरचा वापर व सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून सुरु राहील.
या आदेशाचे भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे, असे मानण्यात येईल व संबंधितांवर सदर कलमानुसार कारवाई करण्यात येईल. १८ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून सदर आदेश लागू होणार आहेत.
Post a Comment