Header Ads

दि २६ फेब्रु : अकोला - प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोच्या प्रचार मोहिमेस जिल्हाधिकारी पापळकर यांचे हस्ते प्रारंभ

कोविड लसीकरण व आत्मनिर्भर भारत जनजागृती
प्रादेशिक लोकसंपर्क ब्युरोच्या प्रचार मोहिमेस जिल्हाधिकारी पापळकर यांचे हस्ते प्रारंभ

    अकोला,दि.26 (जिमाका)- माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या प्रादेशिक लोक संपर्क ब्युरो, अमरावती विभागामार्फत जिल्ह्यात कोरोना लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत जनजागृती  राबविण्यात येणार आहे. या मोहिमेच्या प्रचार रथाला आज जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी हिरवी झेंडी दाखवून या मोहिमेचा प्रारंभ केला.   

    यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर म्हणाले की, माहिती व  प्रसारण मंत्रालयाच्या डिजीटल व्हॅन  तसेच कलापथकाव्दारे गावागावांमध्ये कोरोना विषयक संदेश व लसीकरणाचा प्रसार होईल.  या मोहिमेमुळे लसीकरणाविषयी असलेले गैरसमज दूर होतील. आत्मनिर्भर योजनेअंतर्गत ‘व्होकल फॉर लोकल’  या मोहिमेला प्राधान्य देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.  

    या मोहिमेअंतर्गत संपूर्ण जिल्ह्यात तसेच शहरी व ग्रामीण भागात कोविड लसीकरण व आत्मनिर्भरबाबत प्रचार व प्रसिद्धी राबविण्यात येणार आहे. या चित्ररथ निर्मितीकरीता जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ आणि महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाचे सहकार्य लाभले आहे.

    डिजीटल रथाव्दारे जिल्ह्यात दरदिवशी आठ ते दहा गावात प्रचार करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे क्षेत्रीय प्रसिद्धी अधिकारी इन्द्रवदनसिंह झाला यांनी केले. या मोहिमेकरीता अंबादास यादव, श्रीकांत जांभुलकर यांनी संयोजन केले.

No comments

Powered by Blogger.