Header Ads

२० फेब्रु. - वाशिम जिल्ह्यात आज ९३ कोरोना बाधित 20 FEB - Washim District Corona News

      

       

   20 FEB - Washim District Corona News

२० फेब्रु. - वाशिम जिल्ह्यात आज ९३ कोरोना बाधित  

    वाशिम (जनता परिषद) दि.२० -  (Washim District) वाशिम जिल्ह्यात आज (Corona Positive) कोरोना बाधित म्हणून ९३ रुग्णांची नोंद झाली तर ९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ७६४८  वर पोहोचली आहे. 

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील सामान्य रुग्णालय परिसरातील १, काळे फाईल येथील १, अकोला नाका येथील १, सिव्हील लाईन्स येथील १०, सुंदरवाटिका येथील २, महेश नगर येथील १, लाखाळा येथील १, महात्मा फुले चौक येथील १, सुदर्शन नगर येथील २, वाल्मिकी नगर येथील २, सिंधी कॅम्प येथील १, शुक्रवार पेठ येथील १, तोंडगाव येथील ३, तिवळी येथील १, तामसी येथील २, पार्डी टकमोर येथील ४, वांगी येथील १, मंगरूळपीर शहरातील शिंदे नगर येथील १, मानोली रोड परिसरातील १, बायपास रोड परिसरातील ३, अशोक नगर येथील १, अकोला रोड परिसरातील १, पेडगाव येथील १, मानोली येथील ३, शेलूबाजार येथील १, सोनखास येथील २, चहल येथील १, खडी येथील १, मालेगाव शहरातील ५, मेडशी येथील १, किन्हीराजा येथील १, रिसोड तालुक्यातील कंकरवाडी येथील १, वाकद येथील १, कारंजा शहरातील सुदर्शन कॉलनी परिसरातील १, बंजारा कॉलनी परिसरातील १, भारतीपुरा येथील १, मानोरा रोड परिसरातील २, यशोदा नगर येथील १, माळीपुरा येथील १, जैन मंदिर जवळील १, एसबीआय जवळील २, अंबादेवी येथील १, उंबर्डा बाजार येथील २, धानोरा ताथोड येथील ३, धमनी खडी येथील २, पोहा येथील ४, धनज येथील ३, अंतरखेडा येथील २, मानोरा तालुक्यातील दापुरा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील ५ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. तसेच ९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कृपया SMS ह्या त्रिसूत्री चा अवलम्ब करा.   

  1. S- Social Distancing (अंतर राखा) 
  2. M - Mask (मास्क वापरा) 
  3. S - Sanitizer (वारंवार हात धुवा)   

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ७६४८
  • ऍक्टिव्ह – ३८६
  • डिस्चार्ज – ७१०५ 
  • मृत्यू – १५६

(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.