Header Ads

वाशिम - 24 डिसेंबरला जिल्हास्तरीय युवा महोत्सव


 24 डिसेंबरला जिल्हास्तरीय युवा महोत्सव

वाशिम, दि. 21 (जिमाका) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय,  वाशिम यांच्यावतीने जिल्हयातील युवक-युवतींच्या सुप्त कला गुणांना चालना देण्यासाठी तसेच राष्ट्रीय एकात्मता, राज्याची संस्कृती व परंपरा जतन करण्यासाठी 24 डिसेंबर रोजी जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव Youth Festival चे आयोजन करण्यात आले आहे.

या युवा महोत्सवामध्ये एकांकीका (इंग्रजी व हिंदी), शास्त्रीय गायन (हिंदुस्थानी व कर्नाटकी), शास्त्रीय नृत्य (मनीपुरी, ओडीसी, भरतनाटयम, कथ्थक, कुचीपुडी), बासरी, तबला, विणावादन, मृदंगवादन, हार्मोनियम, लाईटगिटार, लोकनृत्य व लोकगीत या स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी युवक-युवती आपले नाव नोंदवू शकतात.

जिल्हास्तरीय युवा महोत्सवातून उत्कृष्ट संघ निवड करुन विभागीय युवा महोत्सवातून राज्यस्तरीय युवा महोत्सवातून राष्ट्रीयस्तरावर पाठविण्यात येईल. जिल्हा युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी वय 15 ते 29 वय वर्षा आतील युवक-युवती असावे. त्याचप्रमाणे स्पर्धक हा जिल्हयाचा रहिवाशी असावा. या महोत्सवात सहभागी होण्यासाठी जिल्हयातील शाळा, महाविद्यालय, संगीत विद्यालय यांनी आपल्या विद्यार्थी आणि विद्यार्थींनीना प्रोत्साहित करावे.

स्पर्धा परिपत्रकानुसार जिल्हा युवा महोत्सवात राष्ट्रीय युवा महोत्सवामध्ये सहभाग घेतलेल्या गत तीन वर्षातील (सन 2017-18, 2018-19 आणि 2019-20) युवक- युवती यांना सहभागी करुन घेतले जाणार नाही. कोवीड-19 च्या महामारीच्या प्रादुर्भावाचा विचार करुन संचालनालयाच्या निर्देशांचा सदर जिल्हास्तर, विभागस्तर आणि राष्ट्रीयस्तर युवा महोत्सवाचे आयोजन ऑनलाईन पध्दतीने केले असून जिल्हास्तरीय युवा महोत्सवाच्या नोंदणीकरीता https://forms.gle/t6a14zGtj4bWnuL2A या लिंकवर 23 डिसेंबर 2020 पर्यंत नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथील जिल्हा संघटक श्री. राजेश गावंडे (9922365587) यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार यांनी केले आहे.             

No comments

Powered by Blogger.