Washim District Kharip Pik Modified Paisewari - खरीप पिकांची सुधारित हंगामी पैसेवारी जाहीर

Washim District Kharip Pik Modified Paisewari

Washim District Kharip Pik Modified Paisewari

खरीप पिकांची सुधारित हंगामी पैसेवारी जाहीर

  • जिल्ह्यातील प्रमुख पिकांची एकूण सरासरी पैसेवारी ५५ पैसे 
  • ५७१ गावांची सुधारित हंगामी पैसेवारी ५० पैसेपेक्षा जास्त 
  • २२२ गावांची सुधारित हंगामी पैसेवारी ५० पैसे पेक्षा कमी

वाशिम (जनता परिषद) दि.०२  - सन २०२०-२१ मधील District Kharip Pik Modified Paisewari जिल्ह्यातील प्रमुख खरीप पिकांची सुधारित हंगामी पैसेवारी २९ ऑक्टोबर रोजी जाहीर झाली असून जिल्ह्यातील प्रमुख पिकांची एकूण सरासरी पैसेवारी ५५ पैसे इतकी आढळून आली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत कळविण्यात आले आहे.

वाशिम तालुक्यातील १३१ गावांची सुधारित हंगामी पैसेवारी सरासरी ६४ पैसे, मालेगाव तालुक्यातील १२२ गावांची सुधारित हंगामी पैसेवारी सरासरी ४७ पैसे, रिसोड तालुक्यातील १०० गावांची सुधारित हंगामी पैसेवारी सरासरी ४४ पैसे, मंगरूळपीर तालुक्यातील १३७ गावांची सुधारित हंगामी पैसेवारी सरासरी ६५ पैसे, कारंजा तालुक्यातील १६७ गावांची सुधारित हंगामी पैसेवारी सरासरी ५४ पैसे व मानोरा तालुक्यातील १३६ गावांची सुधारित हंगामी पैसेवारी सरासरी ५६ पैसे इतकी निश्चित करण्यात आली आहे. 

जिल्ह्यातील एकूण ७९३ गावांपैकी ५७१ गावांची सुधारित हंगामी पैसेवारी ५० पैसेपेक्षा जास्त आहे, तर २२२ गावांची सुधारित हंगामी पैसेवारी ५० पैसे पेक्षा कमी आढळून आली आहे.

यापूर्वी १ ऑक्टोबर रोजी सन २०२०-२१ मधील जिल्ह्यातील प्रमुख खरीप पिकांची हंगामी (नजर अंदाज)  एकूण सरासरी पैसेवारी ६६ पैसे इतकी काढण्यात आली होती. 
Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

एक टिप्पणी भेजें

साप्ताहिक जनता परिषद अंक - ४३ वर्ष - ४४ दिनांक - २४ नोव्हेंबर २०२२ Janta Parishad E-43 Y-44 24-11-2022

  साप्ताहिक जनता परिषद अंक - ४३     वर्ष - ४४    दिनांक - २४ नोव्हेंबर २०२२    Weekly Janta Parishad    Edition : 43      Year : 44     Date...