Header Ads

फळे, भाजीपाला वाहतुकीकरिता किसान स्पेशल रेल्वेचा लाभ घ्यावा - Take advantage of Kisan Special Railway for transportation of fruits and vegetables


Take advantage of Kisan Special Railway for transportation of fruits and vegetables

फळे, भाजीपाला वाहतुकीकरिता किसान स्पेशल रेल्वेचा लाभ घ्यावा

जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांचे आवाहन 

वाशिम, दि. 11  (जिमाका) : फळे व भाजीपाला उत्पादक शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्या यांच्या मालाच्या वाहतुकीसाठी व विक्रीसाठी महाराष्ट्रामधून जाणाऱ्या तीन किसान स्पेशल रेल्वे सुरु केल्या आहेत. देवळाली (नाशिक) ते दानापूर (पटना), अनंतपूर (आंध्रप्रदेश) ते आदर्श नगर (दिल्ली) व बेंगलोर (कर्नाटक) ते एच. निझामुद्दीन (दिल्ली) या तीन किसान स्पेशल रेल्वे विविध राज्यातून जाणार आहे, तसेच रेल्वे परिसरात फळे व भाजीपाला यांच्या काढणीत्तोर व्यवस्थापनासाठी व पायाभूत सुविधांसाठी रेल्वे विभाग जागा उपलब्ध करून देणार आहे.

देवळाली (नाशिक) ते दानापूर (पटना) या किसान स्पेशल रेल्वेचा मार्ग देवळाली, नाशिक, जळगाव, भुसावळ, खांडवा, जबलपूर, सतना, अलाहाबाद, बक्सार आणि दानापूर असा राहील. अनंतपूर (आंध्रप्रदेश) ते आदर्श नगर (दिल्ली) दरम्यान धावणारी किसान स्पेशल रेल्वे अनंतपूर, सिकंदराबाद, बल्लारशाह, नागपूर, जुझारपूर, इटारसी, भोपाल, बिना, ढौलपूर, आग्रा कान्ट, पलवाळ आणि आदर्शनगर या मार्गावरून धावेल. बेंगलोर (कर्नाटक) ते एच. निझामुद्दीन (दिल्ली) ही स्पेशल किसन रेल्वे बेंगलोर, येलीयुर, मैसूर, हसन, अरसिक्री, देवनागरी, कराजागी, हुबळी, लोंडा, बेलगाव, मिरज, पुणे, दौंड कार्ड लाईन, अनकाई, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, भोपाळ, बिना, झांसी, आग्रा कान्ट, मथुरा, मनवाळ आणि एच. निझामुद्दीन या मार्गावरून धावेल.

फळे व भाजीपाला उत्पादक शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्या यांनी या रेल्वेचा फळे व भाजीपाला वाहतूक व विक्रीसाठी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.