Header Ads

MLC - Amravati Teachers' Constituency election 2020 - मतदान केंद्रांवर दोन दिवस प्रतिबंधात्मक आदेश लागू

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणूक

मतदान केंद्रांवर दोन दिवस प्रतिबंधात्मक आदेश लागू

वाशिम, दि. २७ : भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी १ डिसेंबर २०२० रोजी जिल्ह्यातील ७ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. या सर्व मतदान केंद्र परिसरात ३० नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ६ वा. पासून ते १ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले आहेत.

अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी वाशिम जिल्ह्यातील ५१-मालेगाव, ५२-रिसोड, ५३-वाशिम, ५३-अ वाशिम, ५४-मंगरूळपीर, ५५-कारंजा, ५६-मानोरा या मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. या सर्व मतदान केंद्रांवर ३० नोव्हेंबर २०२० रोजीचे सकाळी ६ वा. पासून ते १ डिसेंबर २०२० रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या ठिकाणी १०० मीटर परिसरात निवडणुकीचे कामाव्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती प्रवेश करू शकणार नाही. मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात प्रतिबंधित क्षेत्रात मतदारांव्यतिरिक्त बेकायदेशीर जमाव करण्यास मज्जाव करण्यात आला आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता नंतर राजकीय पक्षांनी प्रचार सभा घेऊ नयेत. धार्मिक स्थळांचा निवडणुकीच्या संबंधाने उपयोग करू नये, असेही या आदेशात म्हटले आहे.

No comments

Powered by Blogger.