Header Ads

MLC - Amravati division teachers constituency election polling tomorrow अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान

MLC - Amravati division teachers constituency election
MLC - Amravati division teachers constituency election polling tomorrow

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान    

मतदान केंद्रे सुसज्ज
कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक दक्षता
पथके केंद्रावर पोहोचली

 अमरावती, दि. 30 : MLC - Polling for Amravati division teachers constituency election tomorrow   अमरावती विभाग शिक्षक मतदार संघाच्या निवडणूकीसाठी उद्या, मंगळवारी (1 डिसेंबर) सकाळी 8 ते सायंकाळी 5 दरम्यान मतदान होणार असून, त्यासाठी विभागातील पाचही जिल्ह्यांतील मतदान केंद्रे सुसज्ज करण्यात आली आहेत. विभागातील जिल्हा मुख्यालयातून आज निवडणूक साहित्याचे वाटप होऊन मतदान पथके पोलीस बंदोबस्तात मतदान केंद्रावर येऊन पोहोचली आहेत. मतदान  कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर सर्व मतदान केंद्रांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले असून, तपासणीसाठी आरोग्य पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.  

निवडणूकीसाठी अमरावती विभागात 75 मतदान केंद्रांसह 2 सहाय्यकारी मतदान केंद्रे अशी एकूण 77 मतदान केंद्रे आहेत. मतदान केंद्र क्र. 46 (बुलडाणा) व 53 (वाशिम) या ठिकाणी एकूण मतदारांची संख्या एक हजारपेक्षा जास्त असल्यामुळे त्याठिकाणी प्रत्येकी एक सहाय्यकारी मतदान केंद्र देण्यात आले आहे. सर्व मतदान केंद्रावर व्हिडीओग्राफी व वेबकास्टींग करण्यात येणार असून, तशी यंत्रणाही कार्यान्वित करण्यात आली आहे.

Total candidates 27

एकूण 27 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

उमेदवारांची यादी - Candidates list

(एक) राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे उमेदवार – (1) डॉ. नितीन धांडे (भारतीय जनता पार्टी) (2) प्रा. श्रीकांत गोविंदराव देशपांडे (शिवसेना)

(दोन) नोंदणीकृत राजकीय पक्षाचे उमेदवार- (राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त पक्षाच्या उमेदवारांशिवाय अन्य उमेदवार) (3) प्रा. अनिल मधुकरराव काळे (बळीराजा पार्टी) (4) दिलीप निंभोरकर (लोकभारती)

(तीन) इतर उमेदवार -5) अभिजित मुरलीधर देशमुख (अपक्ष) (6) अरविंद माणिकराव तट्टे (अपक्ष) (7) डॉ. अविनाश मधुकरराव बोर्डे (अपक्ष) (8) आलम तनवीर (अपक्ष) (9) आसोले संजय वासुदेव (अपक्ष) (10) उपेंद्र बाबाराव पाटील (अपक्ष) (11) काळबांडे प्रकाश बाबाराव (अपक्ष) (12) काळे सतीश माधवराव (अपक्ष) (13) गावंडे निलेश नारायण (अपक्ष) (14) डवरे महेश विष्णु (अपक्ष) (15) दिपंकर सूर्यभान तेलगोटे (अपक्ष) (16) प्रा. डॉ. प्रवीण विधळे (अपक्ष) (17) बोनकिले राजकुमार श्रीरामआप्पा (अपक्ष) (18) भोयर शेखर मनोहरराव (अपक्ष) (19) डॉ. मुश्ताक अहेमद रहेमान शाह (अपक्ष) (20) मेश्राम विनोद गुलाबराव (अपक्ष) (21) मोहम्मद शकील अब्दुल अजीज कुरेशी (अपक्ष) (22) शरदचंद्र कृष्णराव हिंगे (अपक्ष) (23) श्रीकृष्ण बापूराव ठाकरे (अपक्ष) (24) सरनाईक किरण रामराव (अपक्ष) (25) सावरकर विकास भास्करराव (अपक्ष) (26) सुनील मोतीराम पवार (अपक्ष) (27) संगीता सचिंद्र शिंदे (बोंडे) (अपक्ष)

Total Voters 35 Thousand 622

 35 हजार 622 मतदार बजावणार मतदानाचा हक्क

मतदारसंघातील 5 जिल्ह्यात एकूण 35 हजार 622 मतदार मतदानाचा हक्क आज बजावणार आहेत.  त्यात 26 हजार 60 पुरूष व 9 हजार 562 स्त्रियांचा समावेश आहे. अमरावती जिल्ह्यात 6 हजार 958 पुरूष व 3 हजार 428 स्त्रिया असे मिळून 10 हजार 386, अकोला जिल्ह्यात 4 हजार 305 पुरूष व 2 हजार 175 स्त्रिया मिळून 6 हजार 480, वाशिम जिल्ह्यात 3 हजार 179 पुरूष व 634 महिला मिळून 3 हजार 813, बुलडाणा जिल्ह्यात 5 हजार 649 पुरूष व 1 हजार 810 महिला मिळून 7 हजार 459 आणि यवतमाळ जिल्ह्यात 5 हजार 649 पुरूष व 1810 स्त्रिया मिळून 7 हजार 459 मतदार आहेत.

     मतदानासाठी एकूण 963 अधिकारी व कर्मचारी यांचे मनुष्यबळ सुसज्ज ठेवण्यात आले आहे, मतदान केंद्रावर प्रक्रिया पार पाडण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर एक केंद्राध्यक्ष व तीन मतदान अधिकारी असतील. 77 मतदान केंद्रासाठी 27 झोनल अधिकारी यांची नियुक्त करण्यात आली आहे. मतदानासाठी विभागात 77 मतदान पथकांबरोबरच प्रत्येक जिल्ह्यासाठी तीन याप्रमाणे 15 राखीव पथके तयार करण्यात आली आहेत. एकूण 963 मनुष्यबळात 27 झोनल अधिकारी, 77 मतदान केंद्राध्यक्ष, 231 मतदान अधिकारी, 154 पोलीस कर्मचारी,  92 सूक्ष्म निरीक्षक, 231 आरोग्य कर्मचारी, 92 चतुर्थश्रेणी कर्मचारी यांचा समावेश आहे.

कोरोना साथीच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना

प्रत्येक मतदान केंद्रावर कोविड-19 च्या सुरक्षात्मक व प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अंमलबजावणीसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर एक समुदाय आरोग्य अधिकारी व दोन सहायक असे आरोग्य पथक नेमण्यात आले आहे. एखादा मतदार कोविड संशयित असल्याचे आढळल्यास संबंधित मतदाराला सायं. 4 ते 5 मतदान करण्यासाठी उपस्थित राहण्याकरीता टोकन दिले जाईल. प्रत्येक मतदान केंद्रावर स्वतंत्र विलगीकरण कक्ष स्थापण्यात आले आहेत.  

Districtwise Polling Centers 

अशी आहेत मतदान केंद्रे

अमरावती जिल्हा Amravati District

            धारणी- तहसील कार्यालय, चिखलदरा- तहसील कार्यालय, दर्यापूर-तहसील कार्यालय, अंजनगाव सुर्जी- तहसील कार्यालय, अचलपूर- तहसील कार्यालय व उपविभागीय कार्यालय, चांदूर बाजार- तहसील कार्यालय, भातकूली- उपविभागीय कार्यालय व तहसील कार्यालय, अमरावती (ग्रामीण)- गणेशदास राठी हायस्कुल कक्ष क्रमांक 4, अमरावती (शहर)- जि.प. ऊर्दू मुलींची शाळा कक्ष क्र. 2, जि.प. ऊर्दू मुलींची शाळा कक्ष क्र. 3, जि.प. ऊर्दू मुलींची शाळा कक्ष क्र. 4, जि.प. मुलींची शाळा (कॅम्प) येथील कक्ष क्रमांक 2, 3 व 4, गोल्डन किड्स इंग्लीश स्कूल कक्ष क्रमांक 6, 7 व 8, मोर्शी- तहसील कार्यालय, वरुड- तहसील कार्यालय (2), तिवसा- तहसील कार्यालय, नांदगाव खंडेश्वर- तहसील कार्यालय, चांदूर रेल्वे- तहसील कार्यालय, धामणगाव रेल्वे- तहसील कार्यालय.  

अकोला जिल्हा Akola District

            अकोट- तहसील कार्यालय, तेल्हारा- जुनी इमारत तहसील कार्यालय, बाळापूर- पंचायत समिती सभागृह, अकोला (ग्रामीण)- जि.प. आगरकर कनिष्ट विद्यालय कक्ष क्रमांक 2 व 3, अकोला (शहर)- राधादेवी गोयंका महिला महाविद्यालय कक्ष क्रमांक 1, 2 व 3, जि.प. आगरकर कनिष्ट विद्यालय कक्ष क्रमांक 1, पातुर- तहसील कार्यालय, बार्शी टाकळी- पंचायत समिती सभागृह, मुर्तीजापूर- तहसील कार्यालय.

बुलडाणा जिल्हा Buldhana District

            जळगाव जामोद-तहसील कार्यालय, संग्रामपूर- तहसील कार्यालय, मलकापूर- तहसील कार्यालय, नांदूरा- तहसील कार्यालय, मोताळा- तहसील कार्यालय, शेगाव- तहसील कार्यालय, खामगाव- तहसील कार्यालय, चिखली- तहसील कार्यालय, बुलडाणा- तहसील कार्यालय (2), देऊळगाव राजा- तहसील कार्यालय, सिंदखेड राजा- तहसील कार्यालय, मेहकर तहसील कार्यालय, लोणार- तहसील कार्यालय.

वाशिम जिल्हा Washim District

            मालेगाव- तहसील कार्यालय, रिसोड- तहसील कार्यालय, वाशिम तहसील कार्यालय (2), मंगरुळपीर- तहसील कार्यालय, कारंजा- तहसील कार्यालय, मानोरा- तहसील कार्यालय.

यवतमाळ जिल्हा Yawatmal District

            दारव्हा- बचत भवन, नेर- तहसील कार्यालय, बाभूळगाव- तहसील कार्यालय, यवतमाळ (ग्रामीण)- बचत भवन, यवतमाळ (शहर)- तहसील कार्यालय (2), दिग्रस- तहसील कार्यालय, पुसद- तहसील कार्यालय (2), महागाव- तहसील कार्यालय, उमरखेड- तहसील कार्यालय, आर्णी- तहसील कार्यालय, घाटंजी- तहसील कार्यालय, कळंब- तहसील कार्यालय, राळेगाव- तहसील कार्यालय, केळापूर- तहसील कार्यालय, मारेगाव- तहसील कार्यालय, झरी जामणी- तहसील कार्यालय, वणी- तहसील कार्यालय.

Permissible identity cards for voter identification at the time of voting

मतदानावेळी मतदाराची ओळख पटविण्यासाठी अनुज्ञेय ओळखपत्रे

            मतदार ओळखपत्र नसल्यास पुढील कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतील. आधार ओळखपत्र, वाहन चालविण्याचा परवाना, पॅन कार्ड, पासपोर्ट, केंद्र, राज्य, सार्वजनिक उपक्रम, स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी औद्योगिक हाऊस यांनी वितरीत केलेले सेवा ओळखपत्र, मा. खासदार, मा. आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र, शिक्षक मतदार संघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या शिक्षक मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र, विद्यापीठाद्वारे वितरीत केलेले पदवी किंवा पदविका मुळ प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकरणाने दिलेले अपंगत्वाचे मुळ प्रमाणपत्र (मतदार ओळखपत्रावरील छायाचित्र पुसट असल्याने मतदाराची ओळख पटणे शक्य नसल्यास पर्यायी कागदपत्रांपैकी एक ओळख कागदपत्र सादर करणे आवश्यक राहील.

Instructions to teacher voters

शिक्षक मतदारांना सूचना

विधान परिषद निवडणूकीत मत नोंदविण्यासाठी सूचना

            या निवडणुकीत मतपत्रिकेवर उमेदवारांच्या नावासमोर पसंतीक्रम लिहावा लागणार आहे. या मतदान प्रक्रियेविषयी मतदारांमध्ये जागरुकता निर्माण व्हावी यासाठी ‘मतदारांनी मत कसे नोंदवावे’ याबाबत भारत निवडणूक आयोगाने सूचना दिल्या आहेत. या सूचनांचा अवलंब करुन मतदारांनी योग्य पद्धतीने मतदानाची प्रक्रिया पार पाडावी, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी केले आहे.

1.       केवळ आणि केवळ मतपत्रिकेसोबत पुरवण्यात आलेल्या जांभळ्या शाईच्या स्केच पेननेच मत नोंदवावे. इतर कोणताही पेन, पेन्सिल, बॉल पेनचा वापर करण्यात येऊ नये.

2.     तुमच्या पहिल्या पसंतीच्या उमेदवाराच्या नावासमोरील ‘पसंतीक्रम नोंदवावा’ या रकान्यात ‘1’ हा अंक लिहून मत नोंदवावे.

3.     निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या विचारात न घेता मतपत्रिकेवर जितके उमेदवार आहेत, तितके पसंतीक्रम आपण मतपत्रिकेवर नोंदवू शकता. 

4.    आपले पुढील पसंतीक्रम उर्वरित उमेदवारांसमोरील रकान्यात 2, 3, 4 इत्यादीप्रमाणे आपल्या पसंतीप्रमाणे नोंदवू शकता. एका उमेदवाराच्या नावासमोरील रकान्यात एकाच पसंतीक्रमाचा अंक नोंदवावा. तो पसंतीचा क्रमांक इतर कोणत्याही उमेदवारासमोर नोंदवू नये. पसंतीक्रम हे केवळ 1, 2, 3 इत्यादी अशा अंकामध्येच नोंदविण्यात यावेत. ते एक, दोन, तीन इत्यादी अशा शब्दांमध्ये नोंदवण्यात येऊ नयेत.

5.    पसंतीक्रम नोंदवताना वापरावयाचे अंक हे भारतीय अंकाच्या आंतरराष्ट्रीय स्वरुपात जसे 1, 2, 3 इत्यादी किंवा रोमन अंक स्वरुपात जसे I, II, III किंवा मराठी भाषेतील देवनागरी 1, 2, 3 या स्वरुपात नोंदवावे.

6.     मतपत्रिकेवर कोठेही आपली स्वाक्षरी, आद्याक्षरे, नाव किंवा अन्य कोणताही शब्द लिहू नये. तसेच मतपत्रिकेवर अंगठ्याचा ठसा उमटवू नये.

7.    मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदवताना टिकमार्क ‘√’ किंवा ‘X’ क्रॉसमार्क अशी खूण करू नये. अशी मतपत्रिका अवैध ठरेल. 

8.    आपली मतपत्रिका वैध ठरावी, याकरिता आपण पहिल्या पसंतीक्रमाचे मत नोंदवणे अत्यंत आवश्यक आहे. अन्य पसंतीक्रम नोंदवणे ऐच्छिक आहे, अनिवार्य नाही.

No comments

Powered by Blogger.