Manora Malegaon Nagar Panchayat Election - प्रभाग आरक्षण निश्चितीसाठी २७ नोव्हेंबर रोजी सोडत

 मालेगाव, मानोरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुक 

प्रभाग आरक्षण निश्चितीसाठी २७ नोव्हेंबर रोजी सोडत

वाशिम, दि. २३ (जिमाका) : जिल्ह्यातील (Manora Malegaon Nagar Panchayat Election) मालेगाव व मानोरा नगरपंचायतच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रभागांचे आरक्षण निश्चित करण्यासाठी शुक्रवार, २७ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी ११ वाजता आरक्षण सोडत होणार आहे. याकरिता जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी संबधित विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे.

मालेगाव नगरपंचायत प्रभागांच्या आरक्षण निश्चितीसाठी मालेगाव तहसीलदार कार्यालयाच्या नवीन इमारतीमध्ये आरक्षण सोडत सभा होईल, तर मानोरा नगरपंचायत आरक्षण निश्चितीसाठी मानोरा येथील मुंगसाजी भवन येथे आरक्षण सोडत सभा होणार आहे. या सोडतीमध्ये अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिला व सर्वसाधारण महिला यासाठी आरक्षण निश्चित करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

एक टिप्पणी भेजें

साप्ताहिक जनता परिषद अंक - ४३ वर्ष - ४४ दिनांक - २४ नोव्हेंबर २०२२ Janta Parishad E-43 Y-44 24-11-2022

  साप्ताहिक जनता परिषद अंक - ४३     वर्ष - ४४    दिनांक - २४ नोव्हेंबर २०२२    Weekly Janta Parishad    Edition : 43      Year : 44     Date...