Header Ads

अतिवृष्टी, पुरामुळे बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पहिल्या टप्प्यात २ हजार २९७ कोटींचा निधी वितरित

अतिवृष्टी, पुरामुळे बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पहिल्या टप्प्यात २ हजार २९७ कोटींचा निधी वितरित

मुंबई, दि. 9 : जून ते ऑक्टोबर या कालावधीत विविध जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नुकसान भरपाईच्या पहिल्या हप्त्यापोटी 2 हजार 297 कोटी 6 लाख 37 हजार रुपयांचा निधी वितरित करण्याचा आदेश काढण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून 10 हजार कोटींची नुकसानभरपाई देण्यात येईल, असे जाहीर केले होते. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील मदत लगेच वितरित करण्यात येईल.

जून ते ऑक्टोबर 2020 या कालावधीत राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे किमान 33 टक्के नुकसान झाले आहे. अशा बाधित शेतकऱ्यांना शेतीपिकांच्या (जिरायत व आश्वासित सिंचनाखालील पिके) नुकसानीसाठी रु.10 हजार प्रतिहेक्टर व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी 25 हजार प्रतिहेक्टर या दराने 2 हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्याचे निर्देश आहेत.

No comments

Powered by Blogger.