Header Ads

वाशिम जिल्ह्यातील पोस्ट ऑफिस, बँकेमध्ये ५ वर्षांखालील बालकांच्या आधार नोंदणीस प्राधान्य

 वाशिम जिल्ह्यातील पोस्ट ऑफिस, बँकेमध्ये ५ वर्षांखालील बालकांच्या आधार नोंदणीस प्राधान्य

वाशिम, दि. २७ : जिल्ह्यातील ० ते ५ वयोगटातील बालकांच्या आधार नोंदणीचे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. त्यानुसार  बँक व पोस्ट ऑफिसमध्ये होणाऱ्या आधार नोंदणीत आता ० ते ५ वयोगटातील बालकांच्या आधार नोंदणीला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

इतर वयोगटांच्या तुलनेत ० ते ५ वयोगटातील बालकांची आधार नोंदणी कमी आहे. त्यामुळे या वयोगटातील आधार नोंदणीचे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्याबाबत आधार केंद्र चालक व संबधित शासकीय कार्यालयांची सभा २३ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली आहे. १ डिसेंबर २०२० पासून या बालकांच्या आधार नोंदणीसाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच बँक व पोस्ट ऑफिसमध्ये होणाऱ्या आधार नोंदणीत ० ते ५ वयोगटातील बालकांच्या आधार नोंदणीला प्राधान्य देण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी बँक अथवा पोस्ट ऑफिसमध्ये जावून आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांची आधार नोंदणी करून आधार कार्ड प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.