Header Ads

Action against illegal stockpiling of explosives - बेकायदेशीर विस्फोटक साठवणूक केल्यास होणार कारवाई - जिल्हादंडाधिकारी षण्मुगराजन एस.


Action will be taken in case of illegal stockpiling of explosives
 

बेकायदेशीर विस्फोटक साठवणूक केल्यास होणार कारवाई - जिल्हादंडाधिकारी षण्मुगराजन एस. 

    वाशिम, दि. १२ : दिवाळी सणानिमित्त बेकायदेशीररित्या विस्फोटकांची साठवणूक व विक्री करण्यास आळा घालण्यासाठी वाशिम जिल्ह्यात अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी निर्गमित केले आहेत. Action will be taken against illegal stockpiling of explosives. 

    सार्वजनिक ठिकाणी, निवासी इमारतींमध्ये, गर्दीच्या ठिकाणी फटाक्यांची विक्री व साठवणूक केली जाणार नाही, याची दक्षता घेवून फटाक्यांच्या दुकानांची व अवैध फटाका दुकानांची तपासणी करण्याची, जे परवानाधारक अटी व शर्तींचे पालन करणार नाहीत, अशा दोषी फटाका परवाना धारकांवर विस्फोटक नियम २००८ च्या नियम १२७ अन्वये तत्काळ कार्यवाही करण्याचे काम हे अधिकारी करणार आहेत. 

    निवासी उपजिल्हाधिकारी यांचे कार्यक्षेत्र संपूर्ण जिल्हा राहणार असून उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी हे त्यांचा उपविभाग, तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी हे संबंधित तालुका व नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी हे संबंधित क्षेत्रामध्ये कार्यवाही करणार आहेत, असे जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत कळविण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.