Header Ads

Action against food adulteration - खाद्य पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासना मार्फत आस्थापनांची तपासणी


खाद्य पदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासना मार्फत आस्थापनांची तपासणी
तपासणीसाठी २३ नमुने ताब्यात घेतले

वाशिम, दि. १५ (जिमाका) : दीपावली दरम्यान मिठाईसह अन्न खाद्य पदार्थांची मागणी वाढत असल्याने ज्यादा नफा कमाविण्यासाठी या पदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता असते. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या सूचनेनुसार अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सा. द. तेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील आस्थापनांची तपासणी करण्यात आली.

सणासुदीच्या काळात खाद्य पदार्थांमध्ये भेसळ होऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत अचानक जावून दुकानांची तपासणी केली जाते. त्यानुसार अन्न सुरक्षा अधिकारी नि. रा. ताथोड व य. दि. कोकडवार यांच्या पथकाने जिल्ह्यातील तपासणी दरम्यान १६ आस्थापनांमधील खाद्यतेल, तूप, मिठाई व इतर खाद्य पदार्थ असे एकूण २३ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. हे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून अहवाल प्राप्त होताच पुढील कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे.

जिल्ह्यात भेसळयुक्त पदार्थ विक्री होत असल्यास अथवा इतर काही तक्रार असल्यास नागरिकांनी अन्न व औषध प्रशासन कार्यालय, आकाशवाणी रोड, सिव्हील लाईन, अकोला येथे संपर्क साधावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.