Header Ads

18 Nov - Washim District Corona News - वाशिम जिल्ह्यात आज ११ कोरोना बाधित

 

18 Nov - Washim District Corona News

१८ नोव्हे. - वाशिम जिल्ह्यात  आज ११ कोरोना बाधित

    वाशिम (जनता परिषद) दि.१८ - आज (Washim District) वाशिम जिल्ह्यात ११  व्यक्ति (Corona Positve) कोरोना बाधित  म्हणून ‘तर नोंद झाली तर २३  जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ५९१८  वर पोहोचली आहे. 

    काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील रेनॉल्ड हॉस्पिटल परिसरातील १, मालेगाव शहरातील सिद्धेश्वर कॉलनी परिसरातील १, शहरातील इतर ठिकाणचे ६, मंगरूळपीर शहरातील आठवडी बाजार परिसरातील १, महाकाली नगर परिसरातील १, कारंजा लाड शहरातील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 

    जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या २३ जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ५९१८        
  • ऍक्टिव्ह – १५८       
  • डिस्चार्ज – ५६१६           
  • मृत्यू – १४३
(टिप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.