Header Ads

जिल्हा पोलीस अधिक्षकाचे वतीने पदोन्नतीने फौजदार बनलेल्यांचा व कर्तव्यासह सामाजिक बांधीलकी जपणार्‍या आधुनिक सावित्रीचा सत्कार

washim police news 1

जिल्हा पोलीस अधिक्षकाचे वतीने पदोन्नतीने फौजदार बनलेल्यांचा व कर्तव्यासह सामाजिक बांधीलकी जपणार्‍या आधुनिक सावित्रीचा सत्कार 

वाशिम (जनता परिषद) दि.28 - वाशिम जिल्हा पोलीस दलाचा पदभार स्विकारल्या नंतर (Washim SP Vasant Pardeshi) पोलिस अधिक्षक वसंत परदेशी यांनी नवनविन संकल्पनेच्या माध्यमातून विविध कल्याणकारी, विविध समाजोपयोगी संकल्पनांची अंमलबजावणी केली. तसेच वेळोवेळी पोलीस अधिकारी व अंमलदारा यांना त्यांचे उत्कृष्ठ कामगिरी बद्दल बक्षीस देऊन त्यांचे मनोबल वाढविण्याचे कार्यही केले. यावेळी फौजदार झालेल्या 10 पोलिस फौजदारांचा तसेच आदिवासी पाड्यावर जाऊन शिक्षणाचे धडे देणार्‍या आधुनिक सावित्रीचा सत्कार करण्यात आला. 

पदोन्नती झालेल्या 10 फौजदारांचा केला सत्कार 

washim police news - SP Vasant Pardeshi Sir

सन 2013 मध्ये आयोजित विभागाीय अर्हता परिक्षा उत्तीर्ण केलेल्या अंमलदारांपैकी वाशिम जिल्हा अस्थापनेवर कार्यरत असलेले 10 पोलीस अंमलदार 1) रमेश लक्ष्मण जायभाये 2) फसीउल्ला खान अताउल्लाखान 3) जयकांत रामसिंग राठोड 4) उत्तम नामदेवराव गायकवाड 5) रमेश सुदामराव गलांडे 6) गजानन मधुकरराव चौधरी 7) गजानन नारायण वानखेडे 8) अनिल बापुराव पाटील 9) शांताराम पंडीतराव पाटील 10) धनराज शिवराज तायडे यांची सेवाजेष्ठतेनुसार पोलीस उपनिरीक्षक पदी पदोन्नती झाल्याने त्यांचे मनोबल वाढविण्याकरीता त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी या सर्वांचा शाल व श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. 

आदिवासी पाड्यावर जाऊन शिक्षणाचे धडे देणार्‍या आधुनिक सावित्रीचा ही सत्कार 

washim police news - SP Vasant Pardeshi Sir 2

कर्तव्य पार पाडतांनाच सामाजीक बांधीलकी म्हणून वेळात वेळ काढून आधुनिक सावित्री म्हणून भूमिका वाशिम शहर पोलिस स्टेशन येथे कार्यरत (LPC Sangita Dhole) महिला पोलीस शिपाई संगिताताई ढोले यांनी पार पाडली. कर्तव्यावर असलेल्या चेकपोस्ट जवळचे आदिवासी पाड्यावरील 50-60 मुलांना शिक्षणाचे धडे देणाचे कार्य संगिताताई ढोले यांनी केले. त्यांचे कर्तव्य व सामाजिक कार्याची दखलही जिल्हा पोलीस अधिक्षक यांनी घेतली. त्यांचाही शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांनी स्वागत केले. 

कर्तव्य सांभाळून सामाजिक कार्यात आपला सहभाग नोंदवून पोलीस दलाची प्रतिमा उंचविण्यास सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहनही जिल्हा पोलीस अधिक्षक वसंत परदेशी यांनी केले. 

No comments

Powered by Blogger.