Header Ads

२ नोव्हेंबर रोजीचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द

lokshahi din washim
२ नोव्हेंबर रोजीचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द

वाशिम, दि. २६ (जिमाका) : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी एकाच ठिकाणी होणारी लोकांची गर्दी टाळणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक आहे. त्यामुळे २ नोव्हेंबर २०२० रोजीचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द करण्यात आला आहे.

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. पहिल्या सोमवारी शासकीय सुट्टी येत असल्यास त्यानंतरच्या कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी हा लोकशाही दिन आयोजित केला जातो. मात्र, ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात एकाच ठिकाणी लोकांनी एकत्र येण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे २ नोव्हेंबर रोजीचा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

No comments

Powered by Blogger.