Header Ads

Washim District Kharip Pik Paisewari खरीप पिकांची हंगामी पैसेवारी जाहीर

वाशिम जिल्ह्यातील खरीप पिकांची हंगामी पैसेवारी जाहीर 

एकूण सरासरी पैसेवारी ६६ पैसे

वाशिम, दि. ०१ (जिमाका) : सन २०२०-२१ मधील जिल्ह्यातील खरीप पिकांची हंगामी (नजर अंदाज) पैसेवारी जाहीर झाली असून जिल्ह्यातील प्रमुख पिकांची एकूण सरासरी पैसेवारी ६६ पैसे इतकी निघाली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत कळविण्यात आले आहे.

वाशिम तालुक्यातील १३१ गावांची हंगामी पैसेवारी ७१ पैसे, मालेगाव तालुक्यातील १२२ गावांची हंगामी पैसेवारी ६२ पैसे, रिसोड तालुक्यातील १०० गावांची हंगामी पैसेवारी ६९ पैसे, मंगरूळपीर तालुक्यातील १३७ गावांची हंगामी पैसेवारी ७० पैसे, कारंजा तालुक्यातील १६७ गावांची हंगामी पैसेवारी ६१ पैसे व मानोरा तालुक्यातील १३६ गावांची हंगामी पैसेवारी ६२ पैसे इतकी निश्चित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व ७९३ महसुली गावांची हंगामी पैसेवारी ही ५० पैसेपेक्षा जास्त आहे.

No comments

Powered by Blogger.