Header Ads

सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस येथे कॅम्पस ड्राइव्ह वीक - Pool Campus Drive Week at Siddhivinayak Technical Campus


Pool Campus Drive Week at Siddhivinayak Technical Campus

सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस येथे कॅम्पस ड्राइव्ह वीक

        शेगाव दि.25 -  येत्या आठवड्यात सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस शेगाव येथे तीन कंपनी पूल कॅम्पस ड्राइव्हचे आयोजन केले जात आहे. बीई, बीटेक, एम.बी.ए., डिप्लोमा, 26 ते 28 October ऑक्टोबर सोमवार ते बुधवार ग्रिफिओ टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड कोलकाता, 29 आणि 30  ऑक्टोबर फक्त महिला डिप्लोमा धारकांसाठी गुरुवार आणि शुक्रवार जी. के. एन. एरोस्पेस पुणे आणि आयटीआय उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 29 आणि 30 ऑक्टोबर शुक्रवार आणि शनिवार सुझुकी मोटर्स गुजरातचा समावेश आहे.

        सस्थांचे प्राचार्य डॉ.अनंतजी कुलकर्णी, पराग कोल्हे यांनी सांगितले की, एकीकडे तरुण  नोकऱ्या गमावत आहेत आणि दुसरीकडे कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉक-डाऊन आणि जागतिक साथीच्या पार्श्वभूमीवर सिद्धिविनायक टेक्निकल कैंपस शेगाव ऑनलाइन ऑफलाइन कॅम्पस घेउन बेरोजगाराना नौकरी देत आहे.

        येथील वसुंधरा बहुउद्देशीय सामाजिक संस्था खामगावचे अध्यक्ष श्री.सागर. पांडुरंग फुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत ऑनलाईन आणि ऑफलाइन मेगा कॅम्पस ड्राइव्ह इव्हेंटमध्ये या भागातील 324 विद्यार्थी ची निवड झाली आहे.  

        संस्थेचे प्रशिक्षण व प्लेसमेंट अधिकारी प्रो. प्रमोद वानखेडे म्हणाले की, गेल्या शैक्षणिक सत्र 2019-2020 पासून एकूण 14 कंपन्या कॅम्पस ड्राईव्ह वर आहेत आणि 608 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे, जे विदर्भाच्या या क्षेत्रासाठी अभिमानाची बाब आहे. कॅम्पस प्लेसमेंटच्या माहितीसाठी विद्यार्थी 9284182543 या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

No comments

Powered by Blogger.