Header Ads

महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषद वाशीम च्या वतीने पत्रकारांची प्रशिक्षण कार्यशाळा व पत्रकार, समाजसेवकांचा सन्मान सोहळा संपन्न


आगामी  दोन महिने कारंजेकरांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक   

 तहसिलदार धिरज मांजरे यांचे प्रतिपादन 

महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषद वाशीम च्या वतीने पत्रकारांची प्रशिक्षण कार्यशाळा व पत्रकार,  समाजसेवकांचा सन्मान सोहळा संपन्न 

कारंजा दि.०८ - आगामी काही दिवसात येणारे सण उत्सवाचा व  गर्दीचा दोन महिन्याचा काळ हा अत्यंत बिकट असून कारंजेकरांनी आपली काळजी घेणे महत्वाचे आहे . या दोन महिन्यात जर आपण कोव्हिड -१९  (कोरोना) महामारीला आपल्यापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला, तर निश्चितच पुढील दिवसात आपण कोरोना महामारी मुक्त कारंजा तालुका ठेवण्यात शंभर टक्के यशस्वी होऊ असे प्रतिपादन कारंजाचे तहासिलदार धिरज मांजरे यांनी केले. स्थानिक श्री. कामाक्षा देवी संस्थान सभागृह कारंजा लाड येथे महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषद वाशीम च्या वतीने बुधवारी संपन्न झालेल्या पत्रकार प्रशिक्षण कार्यशाळा व पत्रकारांच्या सन्मान सोहळ्यात त्यांनी आपले विचार व्यक्त केले .

आकस्मिकपणे गेल्या मार्च महिन्यापासून कोरोना या महाभयंकर आजाराने आपल्या देशात हाहाकार माजवीला असून  शासन स्तरावरून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केल्या जात आहे. नाकाबंदी असो की संचारबंदी किंवा आजचा मुक्त संचार या काळात पत्रकारांनी केलेले योगदान निश्चितच महत्वाचे आहे. कारंजा येथील पत्रकार बांधव हे निश्चितच सामाजिक कार्यात अग्रेसर असून त्यांनी विस्थापीत, मजूर, निराधार व्यक्तिना, पालावर राहणाऱ्या गोरगरीबांना उपासमारीपासून वाचविण्यास हातभार लावला. त्या बदल तुम्ही अभिनंदनास पात्र आहात, या शब्दात तहसीलदार धिरज मांजरे यांनी कौतुकही केले.  

दि. ०७/१०/२०२० रोजी बुधवारला श्री. कामाक्षा देवी मंदिर सभागृह कारंजा येथे महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषद वाशीम च्या वतीने पत्रकारांची प्रशिक्षण कार्यशाळा व कोरोना महामारी काळात तन -मन-धनाने योगदान देणाऱ्या पत्रकार व समाजसेवकांचा सन्मान सोहळा घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष कारंजाचे तहसिलदार धिरज मांजरे, उद्घाटक कारंजाचे पोलिस निरीक्षक सतीश पाटिल तर प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसिलदार विनोद हरणे, कारंजाचे तलाठी वक्ते तसेच धानोरकर उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे उदघाटक कारंजाचे पोलीस निरिक्षक सतीश पाटिल यांनी कारंजेकर नागरीकांनी येणाऱ्या सण उत्सवाचे दिवसात विनामास्क फिरू नये,  सामाजिक अंतर राखूनच दैनंदिन कामे करण्याचा सल्ला दिला. तसेच कारंजेकर नागरीक व पत्रकार मंडळी देत असलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केले . श्री. नवदुर्गा उत्सव काळात सावधानता बाळगून सण उत्सव साजरे करावे. शहरात शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यात पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले.  तसेच कोरोनाच्या या काळात आरोग्याची खबरदारी घ्यावी असा सन्देश दिला. 

यावेळी नायब तहासिलदार विनोद हरणे यांनी कारंजेकरांनी वयोवृध्द, म्हाताऱ्या व्यक्ती व बालगोपालांची प्रकृतीची काळजी घेवून त्यांचे वर  विशेष लक्ष्य देण्याचा सल्ला दिला. आज स्वच्छता राखणे,  सामाजिक अंतर ठेवणे, मास्क किंवा मुखाच्छादन तसेच सॅनीटायझर्सचा वापर करणे आपल्या जिवनाचा अविभाज्य घटक झाल्याचे सांगतानाच या महामारीला रोखण्यात पत्रकार बांधवांचा सिहाचा वाटा असल्याचे सांगीतले. 

यावेळी दैनिक मातृभूमिचे तालुका प्रतिनिधी समिर देशपांडे, कारंजा आस्मिताचे संपादक तथा पुणे एक्स्प्रेसचे प्रतिनिधी महेंद्र गुप्ता, आरसीएन पोर्टल प्रतिनिधी माहिला पत्रकार सुनिताताई डोईफोडे (मॅडम), करंज महात्मचे कार्यकारी संपादक विजय पाटील खंडार, साप्ता. करंज महात्मचे मुख्य कार्यकारी संपादक रमेश वानखडे, सहसंपादक रोहीत महाजन, अखिल भारतिय नाटय पारिषद मुंवई नियामक मंडळाचे लोकनियुक्त सदस्य नंदकिशोर कव्हळकर,  हिंमत मोहकर,  शेषराव पाटील इंगोले, स्त्रीशक्ती माहिला सहकारी पतसंस्था कारंजाच्या सौ. छायाताई गजानन गावंडे,  प्रणीताताई दिनेश दसरे, शिक्षीका  सौ. सरलाताई गावंडे, २ामेश्वर खानबरड, उमेश अनासाने, मोहम्मद मुन्नीवाले,  दाऊद मुन्नीवाले, जावेदभाई, प्रल्हादराव भांडे, सुरेश रामभाऊ हाडे, अमोल लोणकर, सुनिल गुंठेवार, नरेश ग्यानचंदानी,  देविदास नांदेकर, राजेश चंदन, चंद्रकांत भोपाळे, संतोष धोंगडे, मेघराज जुमळे, प्रदिप सोनोने, लोमेश पाटील चौधरी, डॉ. गजानन गावंडे,  सौ.सरलाताई शेषराव इंगोले, प्रकाश हांडे,  प्रा. राहुल महाजन,  कैलास हांडे,  हिम्मत मोहकर, माणिकराव हांडे, श्री संत गाडगेबाबा विचार मंच बहुद्देशीय संस्था कारंजा व इतर सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांचा पुष्पगुच्छ व सन्मानपत्र देवून कोरोना योध्दा पुरस्काराने शासकीय अधिकाऱ्यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. 

आपल्या प्रास्ताविकातून संजय कडोळे यांनी महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषद करीत असलेल्या सामाजिक कार्याची माहीती दिली व पत्रकारांनी अन्याया विरूध्द लढण्याकरीता सदैव जागरूक राहण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे संचलन प्रणिता दिनेश दसरे यांनी तर आभार प्रदर्शन ज्ञानेश्वर खंडारे यांनी केले . कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषद वाशीम जिल्हाध्यक्ष संजय म. कडोळे यांनी केले. 

No comments

Powered by Blogger.