Header Ads

08 Oct Washim Corona News - जिल्ह्यात आणखी २१ कोरोना बाधित; एकूण संख्या ४८६८ वर

 

Maze Kutumb Mazhi Jababdari Image

Washim Corona News Today : 20 Positive

दि.०८ ऑक्टो - जिल्ह्यात आणखी २१ कोरोना बाधित; ४१ जणांना डिस्चार्ज

वाशिम (जनता परिषद) दि.०८ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम जिल्ह्यात २१ व्यक्ती कोरोना बाधीत आले असून ४१ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण कोरोना बाधीतांची जिल्ह्यातील संख्या ४८६८ पर्यंत पोहोचली आहे.

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील सिव्हील लाईन येथील १, तिरुपती सिटी परिसरातील १, सुपखेला येथील १, काटा येथील १, रिसोड तालुक्यातील सवड येथील १, मालेगाव तालुक्यातील जऊळका रेल्वे येथील १, मंगरूळपीर शहरातील १, मोहरी येथील ३, कारंजा लाड शहरातील वाणीपुरा येथील १, शासकीय निवासस्थान परिसरातील २, माजीदपुरा येथील १, सिंधी कॅम्प येथील १, गुरुकृपा मेडिकल परिसरातील १, संतोषी माता कॉलनी परिसरातील १, गायत्री नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, महागाव येथील १, पिंप्री मोडक येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

आज ४१ जणांना डिस्चार्ज; १ मृत्यूची नोंद 

दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ४१ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच भरजहांगीर येथील ६० वर्षीय महिलेच्या मृत्यूची व जिल्ह्याबाहेर आढळलेल्या ३१ बाधितांची नोंद आज घेण्यात आली आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ४८६८
  • ऍक्टिव्ह – ६६१
  • डिस्चार्ज – ४१०८
  • मृत्यू – ९८
  • इतर कारणाने मृत्यू - १

(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)

No comments

Powered by Blogger.