Header Ads

Karanja Lad News - Rapid Antigen Test Part 3 - ०५ ऑक्टोबर ते ०९ ऑक्टोबर पर्यंत

 

कारंजात प्रतिष्ठाणे, व्यवसाय व दुकाने मधील व्यक्तींचे 

रॅपीड ऍन्टीजेन टेस्ट चा तीसरा टप्पा 
०५ ऑक्टोबर ते ०९ ऑक्टोबर पर्यंत 

सहकार्य करण्याचे तहसिलदार धिरज मांजरे यांचे आवाहन 

        कारंजा (जनता परिषद) दि. ०३ - कोरोना ह्या महामारीवर नियंत्रण मिळविणेसाठी त्याचा प्रसार व प्रचार रोखले जाणे गरजेेचे आहे. त्यासाठी ट्रेसींग हे सर्वात महत्वाचे हत्यार असून टेस्टींग होणे अत्यावश्यक आहे. अनलॉक च्या प्रक्रियेनंतर सर्वच प्रतिष्ठाणे, व्यवसाय व दुकाने हे सुरु झाले आहेत. तरी येथून याचा प्रसार होऊ नये म्हणून टेस्टींग गरजेचे आहे. 

          त्या अनुषंगाने कारंजा शहरातील काही भागातील दुकानदारांची व तेथे काम करणार्‍यांची रॅपीड ऍन्टीजन टेस्ट पहिल्या ५ दिवसीय टप्प्यात पार पडली. त्यानंतर दूसरा टप्पा २३ सप्टेंबर ते २९ सप्टेंबर या कालावधीत पार पडला. तर आता उर्वरित भागातील तसेच राहिलेले सर्वांची टेस्ट साठी तीसरा टप्पा ०५ ऑक्टोबर ते ०९ ऑक्टोबर या कालावधीत होणार आहे.  यामध्ये उर्वरीत भागातील प्रतिष्ठाणे, व्यवसायिक  व दुकानदारांची रॅपीड ऍन्टीजेन टेस्ट होणार आहे. 

         तरी शहरातील त्या-त्या दिवशी नोंदविलेनुसार भागातील टेस्टींग करुन घ्यावी व सहकार्य करावे असे आवाहन कारंजाचे तहसिलदार धिरज मांजरे यांनी केले आहे. 

          नोंदणी व तपासणी चे स्थळ हे मुलजी जेठा हायस्कुल असून नोंदणी सकाळी १०.०० वाजता केली जाईल तर  प्रत्यक्ष तपासणी १२.०० नंतर करण्यात येईल. 

तारखेनुसार खालील प्रमाणे

(१) दि.०५ ऑक्टोबर - म.फुले चौक ते संभाजी महाराज चौक दारव्हा वेशी पर्यन्त  

(२) दि.०६ ऑक्टोबर - विट्ठल मंदिर ते गुरु मंदिर चौक, दत्त मंदिर ते पोहा वेश, भाजी बाजार, मंगरुलवेश परिसर  

(३) दि.०७ ऑक्टोबर - दिल्ली वेश ते के.एन. कॉलेज रोड, दिल्ली वेश ते माळीपूरा रोड   

(४) दि.०८ ऑक्टोबर - प्रभात टॉकीज रोड ते मस्जिद पूरा परिसर 

(५) दि.०९ ऑक्टोबर - शहरातील सर्व भागातील राहिलेली प्रतिष्ठानें, आस्थापना व दुकाने  

वर दिलेल्या तारखेप्रमाणे त्या-त्या भागातील प्रतिष्ठाणे, व्यवसायीक व दुकाने मधील व्यक्तींचे जास्तीत जास्त रॅपीड ऍन्टीजेन टेस्ट करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तरी सहकार्य करावे असे आवाहन तहसिलदार धिरज मांजरे यांनी केले आहे. 

No comments

Powered by Blogger.