Header Ads

03 Oct - Washim District Corona News - जिल्ह्यात ३९ कोरोना बाधीत; एकुण संख्या ४५०२

             

Maze Kutumb Mazhi Jababdari Logo

दि.०३ आँँक्टोंबर : आज वाशिम जिल्ह्यात ३९ कोरोना बाधीत; एकुण संख्या ४५०२ 

03 Oct - Washim District Corona News Today - 39 Positive

   वाशिम (जनता परिषद) दि.०३ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात वाशिम जिल्ह्यात ३९ व्यक्ती कोरोना बाधीत आले आहेत. आत्तापावेतोचे एकूण कोरोना बाधीतांची जिल्ह्यातील संख्या ४५०२ पर्यंत पोहोचली आहे.

जिल्ह्यात आज ३९ व्यक्ती कोरोना बाधित

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील पुसद नाका येथील २, समर्थ नगर येथील ३, सिव्हिल लाईन येथील ३, जुनी जिल्हा परिषद परिसरातील २, चांडक ले-आऊट परिसरातील १, शुक्रवार पेठ येथील २, लाखाळा येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, सोनखास येथील १, मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील १, मालेगाव शहरातील शिक्षक कॉलनी येथील १, शहरातील इतर ठिकाणचे ४, रिसोड शहरातील कासारगल्ली येथील १, शहरातील इतर ठिकाणचे २, सवड येथील १, चिंचाबाभर येथील १, मोठेगाव येथील १, दापुरी येथील २, वाघी येथील १, मानोरा तालुक्यातील सेवादास नगर येथील २, गिरोली येथील ३, कारंजा लाड तालुक्यातील पोहा येथील १, खेर्डा येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 

आज १०५ डिस्जार्च 

दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या १०५ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच मालेगाव येथील १ व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – ४५०२
ऍक्टिव्ह – ५६५
डिस्चार्ज – ३८४१
मृत्यू – ९५
इतर कारणाने मृत्यू - १

(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)

No comments

Powered by Blogger.