Header Ads

Karanja Lad News - Heavy rain with fierce thunderstorms in the area - Two farmers death in lightning strikes

Two farmers death in lightning strikes

Heavy rain with fierce thunderstorms in the area

 विज पडण्याच्या दोन घटनेत कारंजा तालुक्यात दोन शेतकर्‍यांचा मृत्यू; एक गंभीर 

कारंजासह परिसरात भयंकर विजेच्या कडकडाटासह प्रचंड पाऊस 

कारंजा (जनता परिषद) दि.११ - आज ११ ऑक्टोंबर रोजी दुपारी कारंजा शहरासह तालुक्यात व इतरत्र भयंकर अशा विजेच्या कडकडाटासह आभाळ कोसळल्यागत प्रचंड पाऊस झाला. सर्वात दुर्देवी बाब अशी की विज पडल्यामुळे तालुक्यात शेतात काम करीत असलेल्या दोन शेतकर्‍यांचा मृत्यू झाला असून एक जखमी आहे. 


प्राप्त माहितीनुसार, पहिल्या घटनेत विज पडल्यामुळे तालुक्यातील ग्राम पिंपळगांव खुर्द येथील शेतकरी नानासाहेब जयरामजी टोंग वय ५५ वर्ष यांचा मृत्यू झाला. धो-धो कोसळणार्‍या पावसापासून सोयाबीन वाचविणेसाठी सोयाबीनची गंजी झाकत असतांना नानासाहेब यांच्या अंगावर विज कोसळली.


      दुसर्‍या घटनेत ग्राम नारेगांव येथे शेतकरी धिरज गजानन दोरक हे आपल्या वडीलासह शेतात काम करीत असतांना  विज कोसळली. यामध्ये धिरज गजानन दोरक वय १६ वर्ष याचा मृत्यू झाला तर त्याचे वडील गजानन तुकाराम दोरक वय ४५ वर्ष हे जखमी झाले आहेत. 

अनेक शेतांमध्ये पिकांची कापणी झाली असून अनेक शेतात गंजी करुन लावण्यात आलेली आहे. पावसापासून वर्षभराची मेहनत व भविष्याची कमाई वाचविणेसाठी शेतकर्‍याला कितीही विज कोसळली किंवा पुर आला तरी शेतात जावेच लागते. अशाच परिस्थितीत शेतात काम करीत असतांना विज पडून झालेल्या शेतकर्‍यांच्या मृत्यूमूळे ह्या दोन्ही गावांसह संपूर्ण तालुक्यात एकच शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

No comments

Powered by Blogger.