Header Ads

Registration for National Youth Parliament Scheme - जिल्ह्यातील शाळांनी युवा संसद कार्यक्रमासाठी नोंदणी करण्याचे आवाहन


 Registration for National Youth Parliament Scheme
जिल्ह्यातील शाळांनी युवा संसद कार्यक्रमासाठी नोंदणी करण्याचे आवाहन

वाशिम, दि. १४ (जिमाका) : जिल्ह्यातील शाळांमधील इयत्ता ९ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांमध्ये संसदीय लोकशाहीची मुळे रुजावीत तसेच विद्यार्थ्यांना शिस्त लावण्यासाठी National Youth Parliament Scheme युवा संसद कार्यक्रम केंद्र शासनाच्या संसदीय कार्य मंत्रालयाद्वारे आयाजित केला जातो. या कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता www.nyps.mpa.gov.in  या वेब पोर्टलवर ३१ डिसेंबर २०२० पर्यंत नोंदणी करावी.

जिल्ह्यातील इयत्ता ९ वी ते १२ वीचे वर्ग असलेल्या माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांनी युवा संसद कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी प्रदीप शेटीये यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.