Header Ads

26 Oct Washim District Corona News Today - जिल्ह्यात आणखी २४ कोरोना बाधित; ३६ जणांना डिस्चार्ज

Maze Kutumb Mazhi Jababdari Logo

26 Oct Washim District Corona News 
२६ ऑक्टो. - वाशिम जिल्ह्यात आणखी २४ कोरोना बाधित; ३६ जणांना डिस्चार्ज

    वाशिम (जनता परिषद) दि. २६ - आज Washim District वाशिम जिल्ह्यात २४ व्यक्ति Corona Positve कोरोना बाधित  म्हणून नोंद झाली असून ३६ जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील आता पर्यंतचे एकूण कोरोना बधितांची संख्या ५६१२ वर पोहोचली आहे. 

     काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील रेनॉल्ड हॉस्पिटल परिसरातील १,  आनंदवाडी येथील २, शुक्रवार पेठ येथील १, ड्रिमलँड सिटी येथील १, चंडिकावेस येथील १, तिरूपती सिटी येथील २, आययुडीपी येथील १, ईश्वरी कॉलनी परिसरातील १, शेलगाव येथील १, अडोळी येथील १, रिसोड शहरातील कोपरेशवर चौक परिसरातील १, बी. एम. स्कुल परिसरातील २, हिवरा पेन येथील १, वाकद येथील १, मंगरुळपीर तालुक्यातील गणेशपूर येथील १, चकवा येथील १, मानोरा तालुक्यातील फुलउमरी येथील ३, उमरी बु. येथील २ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

    दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ३६ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच गेल्या काही दिवसांत झालेल्या ३ मृत्यूची नोंद पोर्टलवर झाली आहे.     , 

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ५६१२ 
  • ऍक्टिव्ह – ५३२ 
  • डिस्चार्ज – ४९४५ 
  • मृत्यू – १३४ 
(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)
26 Oct Washim Corona News Today

No comments

Powered by Blogger.