Vardhapan Din

Vardhapan Din

22 Oct Washim corona news today - जिल्ह्यात आणखी ६१ कोरोना बाधित; एकूण संख्या ५५३१ वर

logo maze kutumb mazhi jababdari
Washim Corona News Today 61 Positive 

दि. २२ ऑक्टो - वाशिम जिल्ह्यात आणखी ६१ कोरोना बाधित; एकूण संख्या ५५३१ वर 

वाशिम (जनता परिषद) दि.२२ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार (washim district corona) वाशिम जिल्ह्यात ६१ व्यक्ती कोरोना बाधीत आले असून ४५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण कोरोना बाधीतांची जिल्ह्यातील संख्या ५४७० पर्यंत पोहोचली आहे.

 काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील जुनी आययुडीपी येथील २, आनंदवाडी येथील १,  गवळीपुरा येथील १, चंडिकावेस येथील १, सिव्हील लाईन येथील १, पोलीस वसाहत परिसरातील १, रेनॉल्ड हॉस्पिटल परिसरातील १, अल्लाडा प्लॉट येथील २, सिंचन वसाहत येथील १, संत नगर परिसरातील १, काटीवेस येथील १, लाखाळा परिसरातील १, कोकलगाव येथील १, केकतउमरा येथील १, मोठा उमरा येथील २, सुपखेला येथील १, बोरखेडी येथील १, नागठाणा येथील १, रिसोड शहरातील तहसील कार्यालय परिसरातील २, इतर ठिकाणची १, चिचांबा पेन येथील १, कुऱ्हा येथील १, हराळ येथील २, मांगवाडी येथील १, व्याड येथील २, गोभणी येथील २, मसला पेन येथील १, मानोरा शहरातील १, मंगरूळपीर शहरातील राजस्थानी चौक येथील १, जनुना येथील १, पार्डी ताड येथील ३, पोघात येथील १, शहापूर येथील १, फाळेगाव येथील १, मालेगाव शहरातील वार्ड क्र. १४ येथील ४, शहरातील इतर ठिकाणची १, वसारी येथील १, इराळा येथील १, जऊळका येथील ३, कारंजा लाड शहरातील पहाडपुरा येथील १, खेर्डा येथील ३, कामरगाव येथील १, धामणी येथील ३ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ४५ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच गेल्या काही दिवसातील आणखी २ मृत्यूची नोंद पोर्टलवर झाली आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती
  • एकूण पॉझिटिव्ह – ५५३१
  • ऍक्टिव्ह – ६६२
  • डिस्चार्ज – ४७४७
  • मृत्यू – १२१
(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)
Share on Google Plus

About Janta Parishad

    Blogger Comment
    Facebook Comment

0 comments:

एक टिप्पणी भेजें

Janta Borewells

Janta Borewells
Janta Borewells