Header Ads

19 Oct washim corona news. जिल्ह्यात आणखी २० कोरोना बाधित; ४६ जणांना डिस्चार्ज

  


Washim Corona News Today 20 Positive 

दि.१९ ऑक्टो - वाशिम जिल्ह्यात आणखी २० कोरोना बाधित; ४६ जणांना डिस्चार्ज 

वाशिम (जनता परिषद) दि.१९ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार (washim district corona) वाशिम जिल्ह्यात २० व्यक्ती कोरोना बाधीत आले असून ४६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण कोरोना बाधीतांची जिल्ह्यातील संख्या ५४०२ पर्यंत पोहोचली आहे.

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम तालुक्यातील नागठाणा येथील १, मालेगाव तालुक्यातील जऊळका येथील १, रिसोड तालुक्यातील लोणी येथील १, भापूर येथील १, मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार येथील १, पार्डी ताड येथील ३, कारंजा लाड शहरातील मेन रोड परिसरातील १, गुरु मंदिर जवळील ३, पहाडपुरा येथील २, कामरगाव येथील ६ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. 

दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ४६ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आणखी एका मृत्यूची नोंद झाली आहे.

  कोरोना बाधितांची सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह – ५४०२
ऍक्टिव्ह – ६७६
डिस्चार्ज – ४६०८
मृत्यू – ११७
(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे. इतर कारणाने झालेल्या एका मृत्यूचा यामध्ये समावेश नाही.)

No comments

Powered by Blogger.