Header Ads

12 Oct Washim Corona News जिल्ह्यात आणखी ६६ कोरोना बाधित; एकुण संख्या ५०३१ वर

 Maze Kutumb  Mazhi Jababdari logo

Washim Corona News Today 66 Positive

दि. १२ ऑक्टो - वाशिम जिल्ह्यात आणखी ६६ कोरोना बाधित; ४९ जणांना डिस्चार्ज

वाशिम (जनता परिषद) दि.१२ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम जिल्ह्यात ६६ व्यक्ती कोरोना बाधीत आले असून ४९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. एकूण कोरोना बाधीतांची जिल्ह्यातील संख्या ५०३१  पर्यंत पोहोचली आहे.

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील शुक्रवार पेठ येथील ३, तिरुपती सिटी येथील १, जैन चौक परिसरातील १, जिल्हा परिषद परिसरातील १, जुनी पोलीस वसाहत परिसरातील ३, लाखाळा येथील ४, योजना कॉलनी परिसरातील १, चांडक ले-आउट परिसरातील १, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरातील १, आययुडीपी कॉलनी परिसरातील १, माऊलीनगर येथील १, इतर ठिकाणचा १, अनसिंग येथील २, जांभरूण येथील १, राजगाव येथील १, दापुरा येथील १, सुपखेला येथील ४, उमरा कापसे येथील १, सावरगाव बर्डे कॅम्प येथील १, मालेगाव शहरातील बसस्थानक परिसरातील १, अकोला फाटा परिसरातील १, इराळा कॅम्प परिसरातील १, मसला पेन येथील १, नागरतास येथील १, आमखेडा येथील १, रिसोड तालुक्यातील सवड येथील १, हराळ येथील १, मंगरूळपीर शहरातील मंगलधाम येथील १, इतर ठिकाणचे १०, कवठळ येथील २, कारंजा लाड शहरातील ममता नगर येथील १, वाणीपुरा येथील १, नगरपरिषद कॉलनी परिसरातील १, गायत्री नगर येथील ६, सिंधी कॅम्प येथील १, इतर ठिकाणचे २, लोणी येथील १, पारवा पोहर येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

आज ४९ डिस्चार्ज, ३ म्रुत्यु ची नोंद

दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ४९ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच गेल्या दहा दिवसांत जिल्ह्याबाहेर आणखी ३ व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याची नोंद पोर्टलवर झाली आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती

  • एकूण पॉझिटिव्ह – ५०३१  
  • ऍक्टिव्ह – ६६५  
  • डिस्चार्ज – ४२६०
  • मृत्यू – १०५ 
  • इतर कारणाने मृत्यू - १

(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)

No comments

Powered by Blogger.