Header Ads

06 Oct washim corona news today - जिल्ह्यात ३३ कोरोना बाधीत; एकुण संख्या ४७३८

               

Maze Kutumb Mazhi Jababdari Logo

दि.०६ आँँक्टोंबर : आज वाशिम जिल्ह्यात ३३ कोरोना बाधीत; एकुण संख्या ४७३८ 

06 Oct - Washim District Corona News Today - 33 Positive

   वाशिम (जनता परिषद) दि.०६ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात वाशिम जिल्ह्यात ३३  व्यक्ती कोरोना बाधीत आले आहेत. आत्तापावेतोचे एकूण कोरोना बाधीतांची जिल्ह्यातील संख्या ४७३८ पर्यंत पोहोचली आहे.

जिल्ह्यात आज ३३ व्यक्ती कोरोना बाधित

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार वाशिम शहरातील त्रिवेणी नगर परिसरातील १, अनसिंग येथील १, मालेगाव शहरातील १, कोठा येथील १, किन्हीराजा येथील १, रिसोड तालुक्यातील मोप येथील १, मंगरूळपीर शहरातील मंगलधाम येथील ४, कारंजा रोड परिसरातील २, जांब रोड परिसरातील ४, सावरगाव येथील १, शेलूबाजार येथील ३, सोनखास येथील १, सार्सी येथील १, कारंजा लाड शहरातील टिळक चौक येथील ३, सिंधी कॅम्प येथील १, शिवाजी नगर येथील १, शहरातील इतर ठिकाणचा १, पोहा येथील १, खेर्डा येथील १, नागलवाडी येथील २, महागाव येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

आज ४६ डिस्जार्च 

दरम्यान, जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या ४६ व्यक्तींना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत जिल्ह्याबाहेर बाधित आढळलेल्या ४८ रुग्णांची नोंद आज घेण्यात आली आहे.

कोरोना बाधितांची सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह – ४७३८
ऍक्टिव्ह – ६४४
डिस्चार्ज – ३९९७
मृत्यू – ९६
इतर कारणाने मृत्यू - १

(टीप: वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेर उपचार घेणाऱ्या बाधितांची आहे.)

No comments

Powered by Blogger.