Header Ads

नागरिकांनी माहिती अधिकार अधिनियमातील तरतुदींचा लाभ घ्यावा

 
Mahiticha Adhikar RTI माहितीचा अधिकार

नागरिकांनी माहिती अधिकार अधिनियमातील तरतुदींचा लाभ घ्यावा

 वाशिम जिल्हा पोलीस दलाचे आवाहन

वाशिम, दि. २६ (जिमाका) : माहिती अधिकार अधिनियमाबाबत जनजागृती करण्यासाठी २८ सप्टेंबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून साजरा केला जातो. लोकशाहीचा आदर करीत नागरिकांना माहिती मिळविण्याचा हक्क देण्यासाठी माहितीचा अधिकार अधिनियम २००५ हा कायदा करण्यात आला आहे. राज्य कारभारात पारदर्शकता, खुलेपणा व नागरिकांच्या प्रति जबाबदारींची, उत्तरदायीत्वाची जाणीव निर्माण करणे, हा कायद्याचा मुख्य उद्देश आहे.

वाशिम पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस दल आस्थापनेवर पोलीस उपअधीक्षक (गृह) एस. जी. घुगे हे जनमाहिती अधिकारी आहेत. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९८२३१५७०५१ व ई-मेल आयडी dysphome.wsm@mahapolice.gov.in असा आहे. अप्पर पोलीस अधीक्षक विजय चव्हाण हे अपिलीय अधिकारी असून त्यांचा भ्रमणध्वनी क्र. ७७०९९७५९०६, ई-मेल आयडी readeraddspwashim@gmail.com असा आहे. नागरिकांना ऑनलाईन अपील दाखल करण्यासाची अमरावती येथील राज्य माहिती आयुक्त खंडपिठाचा ई-मेल आयडी sic-amravati@gov.in असा आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी माहिती अधिकार अधिनियमातील तरतुदींचा व सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन वाशिम जिल्हा पोलीस दलामार्फत करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.