Header Ads

Washim News MNS - जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा : मनसे



जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा : मनसे

जिल्हाधिकारी व कृषी अधिकारी कार्यालया समोर घंटानाद व थाळीनाद आंदोलन

वाशिम (का.प्र.) दि. २९ - मागील काही दिवसापासून झालेल्या परतीच्या पावसाने शेतकर्‍यांच्या तोंडाशी आलेल्या शेतमालाचे आतोनात नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीची त्वरीत पंचनामे करुन जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा व शेतकर्‍यांना तात्काळ हेक्टरी 50 हजार रुपये आर्थिक द्यावी, रब्बी पिकांसाठी मोफत बी-बीयाणे द्या आदी मागण्या संदर्भात  जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने प्रभारी जिल्हाध्यक्ष मनिष डांगे यांच्या नेतृत्वात घंटानाद, थाळीनाद आंदोलन करण्यात आले

 वाशिम तालुक्यातील काटा गावात अंदाजे 225 हेक्टर उस पीक आडवे झाले. मंगरुळपीर, मानोरा व इतर तालुक्यामध्ये सोयाबीनच्या शेंगा नुसत्याच फुगल्या आहेत व झाडांची अवास्तव वाढ झाली असून, परतीच्या संततधार पावसामुळे शेतात पाणी साचल्यामुळे शेतकर्‍यांना फोर मोठा आर्थिक फटका बसला आहे. फळबागामध्ये फळझाडे जागीच आडवी झाली असल्याने फळांची माती झाली आहे. अतिवृष्टीमुळे पिकांची नासधूस झाली असून, जमीन खरडली आहे. एव्हढे होऊनही नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या शेतात अद्याप पंचनामे देखील झालेले नाहीत खरीप हंगामातील प्रामुख्याने उडीद, मुंग, सोयाबीन, ज्वारी मका, कपाशी आदी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. मात्र प्रशासन निद्रावस्थेत असल्याने त्यांची झोप उडविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा कृषी आंदोलन करून सुद्धा मदत मिळत नसल्याने, बहिर्‍या सरकारपर्यंत आवाज पोहोचावा म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने व शेतकर्‍यांनी घंटानाद, थाळीनाद आंदोलन केले.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अमोल लुलेकर, मानोरा तालुका अध्यक्ष मनोज खडसे, शहराध्यक्ष महादेव भस्मे, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन शिवलकर, जिल्हा उपाध्यक्ष अमोल मुळे, जिल्हा सरचिटणीस अमोल गाभणे, ता. अध्यक्ष मोहन कोल्हे, रवि वानखेडे, किशोर गजरे, मोहम्मद नौरंगाबादी, शिवाजी नवगणकर, विठ्ठल राठोड, विमला राठोड, मैनोद्दीन काजी, केशव कांबळे, गणेश जाधव, दत्ता उगले, रवि बानकर, दिलीप जुनघरे, मधुकर मुसळे, किशोर शिंदे, हनुमान घोडे, आबा सोनटक्के, अहिर, गोकुल जाधव, रमेश चव्हाण, रुख्मीणा वानखेडे, बेबीबाई धुळधुळे, बेबीबाई भगत, वंदना अक्कर, गुलाब भगत, रवि राऊत, राजु किडसे, शिवाजी शिंदे, सुनिल वाघ, गजानन कुटे, श्री. देशमुख, चेतन गव्हांदे, हर्षल मोरे, अशोक नाईकवाडे यांच्यासह असंख्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला.

No comments

Powered by Blogger.