Header Ads

Karanja lad Upjilha Rugnalay News. सामान्य नागरिकांनी भिती न बाळगता आरोग्य सेवांचा लाभ घ्यावा


कारंजा उपजिल्हा रुग्णालयात कोरोनो रुग्णांची इमारत व साधारण रुग्णांची इमारत ह्या वेगवेगळ्या 

सामान्य नागरिकांनी भिती न बाळगता आरोग्य सेवांचा लाभ घ्यावा 

तहसिलदार धिरज मांजरे व वैद्यकीय अधिक्षक डॉ.बाळासाहेब लहाणे यांचे आवाहन 

कारंजा (का.प्र.) दि.२९ - कारंजा उपजिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांची इमारत व साधारण रुग्णांची इमारत ह्या वेगवेगळ्या असून याबाबत सामान्य जनतेने कोणत्याही प्रकारची भिती किंवा गैरसमज मनात बाळगू नये. ह्या दोन्ही बाबी वेगवेगळ्या असून त्यांच्यात तेवढाच अंतरही ठेवण्यात येतो आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांनी कोणत्याही प्रकारची भिती न बाळगता रुग्णालयात तपासणीस यावे असे जाहीर आवाहन एका पत्रकाद्वारे कारंजाचे तहसिलदार धिरज मांजरे व वैद्यकीय अधिक्षक डॉ.बाळासाहेब लहाणे यांनी केले आहे. 

उपजिल्हा रुग्णालय कारंजा येथे स्त्रीरोग तज्ञ, बालरोग तज्ञ व जनरल सर्जन हे बाह्यरुग्ण विभागात दररोज सकाळी ९.०० ते १२.०० या कालावधीमध्ये उपस्थित राहणार आहेत. 

गरोदर मातांची तपासणी ही मंगळवार व शुक्रवार या दोन दिवशी स्त्रीरोग तज्ञ यांचे कडून सकाळी ९.०० ते १२.०० या कालावधीत केली जाईल. 

दर शनीवारी बाल रुग्णांना लसीकरण सकाळी ९.०० ते १२.०० या कालावधीत देण्यात येईल. 

सामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा पुरविण्यासाठी कारंजा उपजिल्हा रुग्णालयात वरील सर्वच बाबींवर कार्य सुरु असून सामान्य नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. 

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.