Header Ads

Washim Corona News Today 02 September : वाशिम जिल्ह्यात ४९ कोरोना बाधीत; संख्या १८६२ वर

corona test

Washim Corona News Today 02 September

दि.०२ सप्टेंबर: वाशिम जिल्ह्यात ४९ कोरोना बाधीत; संख्या १८६२ वर आज १९ जणांना डिस्जार्च तर ३ मृत्यूंची नोंद 


वाशिम (जनता परिषद) दि.०२ - आज जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दिवसभरात वाशिम जिल्ह्यात  ४९ व्यक्ती कोरोना बाधीत आले आहेत यामुळे आत्तापावेतोचे एकूण कोरोना बाधीतांची जिल्ह्यातील संख्या ही १८६२ पर्यंत पोहोचली आहे. तर आज दिवसभरात १९ व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला असून ३ व्यक्तींच्या मृत्युंची नोंद ही आहे. 

जिल्ह्यात आणखी ४९ व्यक्ती कोरोना बाधित

काल रात्री उशिरा व आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्राप्त अहवालानुसार, 
Washim वाशिम शहरातील देवपेठ परिसरातील ६, दंडे चौक परिसरातील २, इंदिरा चौक परिसरातील १, नवीन पोलीस वसाहत परिसरातील १, लाखाळा परिसरातील १, फाळेगाव येथील १, 
Risod रिसोड शहरातील शिवाजीनगर येथील ५, देशमुख गल्ली परिसरातील ३, महानंदा कॉलनी परिसरातील १, खडकी सदार येथील १, किनखेडा येथील १, 
Malegaon मालेगाव शहरातील कुटे वेताळ परिसरातील १, खवले वेताळ परिसरातील १, पाण्याची टाकी, नागरतास रोड परिसरातील १, ब्राह्मणवाडा येथील २, डव्हा येथील ५, करंजी येथील १, शिरपूर जैन येथील १, 
Mangrulpir मंगरूळपीर तालुक्यातील जनुना येथील १, 
Karanja Lad कारंजा लाड शहरातील कुंभारपुरा येथील ३, अकोला अर्बन बँक जवळील १, गौतम नगर येथील २, सराफा लाईन येथील १, मानोरा रोड परिसरातील १, शिवाजी नगर येथील १, कामरगाव येथील ३, महागाव येथील १ व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे.

दिवसभरात १९ व्यक्तींना डिस्जार्च

वाशिम शहरातील ग्रीन पार्क कॉलनी परिसरातील १, चंडिकावेस परिसरातील १, काळे फाईल येथील २, जुनी आययुडीपी येथील १, वारा जहांगीर येथील ७, दोडकी येथील १, रिसोड तालुक्यातील सवड येथील १, आसेगाव पेन येथील २, मंगरूळपीर शहरातील हरिकृपा कॉलनी परिसरातील १, मानोरा तालुक्यातील उमरी खुर्द येथील १, मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथील १ व्यक्तीला डिस्चार्ज देण्यात आला.

आज ३ मृत्यूंची नोंद 

दरम्यान, २४ ऑगस्ट रोजी जिल्हा कोविड रुग्णालयात दाखल झालेल्या रिसोड शहरातील अग्रवाल भवन समोरील परिसरातील ६० वर्षीय व्यक्तीचा आज, २ सप्टेंबर रोजी १०.३० वा. दरम्यान उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तसेच मंगरूळपीर शहरातील ५० वर्षीय व्यक्तीचा १९ ऑगस्ट रोजी व मंगरूळपीर येथीलच ३२ वर्षीय व्यक्तीचा १८ ऑगस्ट रोजी अकोला येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

सद्यस्थिती :
एकुण रुग्ण संख्या - १८६२   ऍक्टीव्ह रुग्ण - ४६८
डिस्जार्च - १३६०          मृत्यू - ३३ (+१)
(टिप : वरील आकडेवारी जिल्ह्यात तसेच जिल्हाबाहेर उपचार घेणार्‍या बाधितांची आहे.)

No comments

Powered by Blogger.