Header Ads

धोबी (परिट) समाजबांधवांचे वतीने राज्य शासनाचे त्या दिरंगाईचे विरोधात वाशिम जिल्ह्यात निषेध


धोबी (परिट) समाजबांधवांचे वतीने राज्य शासनाचे त्या दिरंगाईचे विरोधात वाशिम जिल्ह्यात निषेध 

समाजाला पुर्ववत अनुसूचित जातीत समाविष्ठ करणेसाठी केंद्राचे समाजिक न्याय विभागचे प्रपत्रात विहीत नमुन्यात राज्य शासनाने माहिती पाठविली नाही  

कारंजा (जनता परिषद ) दि.०५ - धोबी(परिट) समाजाला पुर्ववत अनुसूचित जातीत समाविष्ठ करण्याकरिता सामाजिक न्याय विभाग दिल्ली च्या प्रपत्रा मध्ये महाराष्ट्र शासनाने विहित नमुन्यात माहिती न पाठविल्याने धोबी(परिट) समाजा तर्फे महाराष्ट्र राज्य धोबी(परिट) समाज महासंघ(सर्व भाषीक) कडून  प्रशासनाला निवेदने देवून काळ्या फीती लावून समाजा तर्फे निदर्शने करण्यात आली 
महासंघाने आपल्या निवेदनात म्हटले की, संपूर्ण भारतात धोबी समाज हा राहनीमानाने व पारंपरिक व्यवसायाने एकच आहे. महाराष्ट्र निर्मिती पूर्वी हा समाज अनुसुचित जाती मध्ये होता. भाषावार प्रांत रचने नंतर विदर्भातील काही जिल्हे है मध्यप्रदेश मध्ये समाविष्ठ झालेत ज्याचे परिणामी जे बांधव मध्यप्रदेश मध्ये समाविष्ठ झालेत त्यांच्या अनुसुचित जातीच्या सवलती कायम राहिल्यात तर महाराष्ट्रातील बांधवांच्या सवलती रद्द झाल्यात. समाज एकच मात्र याच समाजाला काही ठिकाणी सवलतीचा लाभ तर काही ठिकाणी नाही असे झाले. 
दरम्यान वेळोवेळी मोर्चे, मेळावे तसेच निवेदने देवून सरकारला धारेवर धरण्यात आलेे होते म्हणून सरकारने डॉ भांडे यांच्या अध्यक्षतेखाली धोबी समाज पुनर्वलोकन समिति गठित केली होती.

या समिती ने सुद्धा संपूर्ण भारतात पसरलेल्या धोबी समाज हा एकच असुन त्यांना अनुसूचित जातीत पुन्हा समाविष्ठ करण्याची शिफारस केली होती. परिणामी भारत सरकार च्या सामाजिक न्याय विभागाने महाराष्ट्रा च्या सामाजिक न्याय विभागाला प्रपत्रामध्ये योग्य ती माहिती भरून पाठवण्याचे निर्देश दिले होते. मात्र ह्या विभागाने अद्यापही ही माहिती भरून न पाठविल्यामुळे महाराष्ट्र राज्य धोबी (परिट) समाज महासंघ ने संस्थापक अध्यक्ष देवरावजी सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात काळ्या फिती लावून निदर्शने करीत तहसीलदार यांना निवेदन दिले.
यावेळी प्रा आनिल मसके, विदर्भ महासचिव, गुलाबराव थुंकेकर, ता अध्यक्ष, संतोष ढ़ोंगड़े, जिल्हा संघटक, संदीप क़ुर्हे, जिल्हा उपाध्यक्ष, अजय श्रीवास युवा जिल्ह्या अध्यक्ष, राजेश चंदन प्रदेश सदस्य, सचिन कोलस्कर, सुरेश तिड़के, गजानन तिड़के, प्रवीण तुपोने, सुनील तिड़के, प्रकाश शहाकार, रामकृष्ण मसके, राजाभाउ कडूकार, माणिक मोखड़कर आदिंची उपस्थिती होती. 

No comments

Powered by Blogger.