Header Ads

free webinar on Interview Techniques and Mantras - ‘मुलाखत तंत्र आणि मंत्र’ विषयावर बुधवारी मोफत वेबीनारचे आयोजन

free webinar on Interview Techniques and Mantras

‘मुलाखत तंत्र आणि मंत्र’ विषयावर बुधवारी मोफत वेबीनारचे आयोजन

Free Webinar on 'Interview Techniques and Mantras'

          वाशिम, दि. १४ : शासकीय, निमशासकीय तसेच नामांकित खाजगी आस्थापनामध्ये नियुक्तीसाठी आवश्यक भाग असलेल्या मुलाखतीला आत्मविश्वासाने सामोरे जाणे खूप महत्वाचे असते. जिल्ह्यातील सर्व सुशिक्षित बेरोजगार युवक, युवतींना या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यासाठी बुधवार, १६ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी ११.३० ते दुपारी १ वा. या वेळेत Free Webinar on 'Interview Techniques and Mantras' मुलाखत तंत्र आणि मंत्र’ या विषयावरील मोफत वेबीनारचे आयोजन करण्यात आले आहे.  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्राच्यावतीने आयोजित या वेबीनारमध्ये भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या नॅशनल करिअर सर्व्हिसचे समन्वयक Dr. Anil Jadhav डॉ. अनिल जाधव मार्गदर्शन करणार आहेत.

         या वेबीनारमध्ये सहभागी होवू इच्छिणाऱ्या युवक, युवतींनी https://meet.google.com/key-paau-hkt या लिंकवर क्लिक करून या सत्रात सहभागी व्हावे. वेबीनारमध्ये सहभागी होण्यासाठी ‘गुगल मीट’ (google meet) अॅप डाऊनलोड करावे. या अॅपमधून कनेक्ट झाल्यानंतर ‘आस्क टू जॉईन’ (Ask to Join) वर क्लिक करावे. सत्रामध्ये सहभागी होण्यापूर्वी १० मिनिट अगोदर जॉईन करावे. कनेक्ट झाल्यानंतर लगेच आपला व्हिडीओ व माईक बंद (म्युट) करावा. सत्राच्या शेवटी काही प्रश्न असल्यास माईक सुरु करून प्रश्न मोजक्या शब्दात विचारावेत व पुन्हा लगेच माईक बंद करावा. काही अडचणी असल्यास ०७२५२-२३१४९४, ९६६५५२५६५१ या क्रमांकावर अथवा जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्र येथे प्रत्यक्ष संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती सुनंदा बजाज यांनी केले आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.