Header Ads

Call of a 7 day Janta Curfew in Washim Town : १६ ते २२ सप्टेंबर पर्यत स्वयम उस्फुर्त जनता कर्फ्यु

Janta Curfew, जनता कर्फ्यू

वाशिम शहरात १६ ते २२ सप्टेंबर पर्यत सात दिवस स्वयं उस्फुर्त जनता कर्फ्यु 

Call of a 7 day Janta Curfew in Washim Town

व्यापारी मंडळ व व्यापारी युवा मंडळाचा संयुक्त निर्णय

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमिवर महेश भवन येथील बैठकित झाला निर्णय 

          वाशीम (का.प्र.) दि.13 - शहरासह जिल्हयात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण विक्रमी संख्येने वाढत असून मृत्युसंख्याही झपाट्याने वाढत आहे. यामुळे शहरातील व्यापार्‍यांसह सर्वसामान्य नागरीक भयग्रस्त आणि चिंताग्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत जनतेतून उर्स्फुतपणे जनता कर्फ्यु राबविण्याची मागणी जोर धरत आहे. त्यामुळे शहरात कोरोना समुह संसर्गाला अटकाव होण्याच्या दृष्टीकोनातून निर्णायक पावले उचलण्यासाठी व्यापारी मंडळ आणि व्यापारी युवा मंडळासह विविध सामाजीक संघटनांच्या प्रतिनिधींची एक संयुक्त बैठक १२ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता स्थानिक महेश भवन येथे पार पडली. या बैठकीत येत्या बुधवार, १६ सप्टेंबरपासून २२ सप्टेंबरपर्यत सात दिवस दवाखाने, हॉस्पीटल, मेडीकल व दुध विक्री आणि संकलन ही सेवा वगळता वाशीम शहरामध्ये उस्फुर्तपणे जनता कर्फ्यु राबविण्याचा एकमुखाने निर्णय घेण्यात आला. अत्यावश्यक सेवेमध्ये दुधविक्री आणि संकलनाची वेळ सकाळी ८ ते १० आणि सायंकाळी ६ ते ८ अशी राहणार आहे.
              सदर बैठकीला व्यापारी मंडळाचे अध्यक्ष जुगलकिशोर कोठारी, सचिव मनिष मंत्री, व्यापारी युवा मंडळाचे अध्यक्ष आनंद चरखा, सचिव भरत चंदनानी, प्रवक्ता गोविंद वर्मा, माजी नगराध्यक्ष राजु राठी, हरिष सारडा, माजी नगराध्यक्ष सुरेश लोध, विवेक पाटणी, बॉबी गुलाटी, सुभाष उखळकर, शैलेश दुरतकर, नितीन विसपुते, शाम नेनवाणी, बबलुभाई, मुशीरभाई, रामदास चांदवाणी, आशिष ठाकुर, बबलुभाई राठी, नंदकिशोर पाटील, वसंता परळकर, राजु अग्रवाल, पप्पु नेनवाणी आदीसह विविध सामाजीक संघटनांचे प्रतिनिधी आणि व्यापारी बांधवांची उपस्थिती होती. सदर बैठकीत शहरात अनलॉक ४ नंतर सुरु झालेला कोरोनाचा समुह संसर्ग आणि रोज विक्रमी संख्येने वाढत असलेल्या कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांच्या आकडेवारीवर चिंता व्यक्त करण्यात आली. सर्वसामान्य नागरीकांच्या हितासाठी आणि त्यांच्या जिविताच्या रक्षणासाठी व्यापारी बांधवांच्या वतीने कमीत कमी सात दिवस जनता कर्फ्युचा निर्णय घेवून या सात दिवसात शहरातील संपुर्ण बाजारपेठ, लहानमोठी दुकाने पुर्णत: बंद ठेवण्याचा निर्णय झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

शहरवासीयांच्या जिविताच्या रक्षणासाठी लहानमोठ्या सर्व व्यापार्‍यांनी सात दिवस आपली दुकाने बंद ठेवून सहकार्य करावे 
- गोविंद वर्मा, प्रवक्ता, व्यापारी युवा मंडळ

           शहरात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत असल्यामुळे शासन, प्रशासन, आरोग्य विभागासह अन्य घटक या संकटाशी अहोरात्र झटत आहेत. अशा परिस्थितीत व्यापार्‍यासंह सर्वसामान्य नागरीकांचीही जबाबदारी वाढली आहे. या कोरोना संकटाला हद्दपार करण्यासाठी वाशीम शहरवासीयांच्या सहकार्याची आवश्यकता असून व्यापारी मंडळ व व्यापारी युवा मंडळाने घेतलेल्या या जनता कर्फ्युला शहरातील सर्व लहानमोठ्या व्यापारी बांधव, दुकानदार व आम जनतेने सहकार्य करुन आपआपली प्रतिष्ठाने १६ ते २२ सप्टेंबरपर्यत संपुर्णपणे बंद ठेवावी. यासोबतच नागरीकांनी १६ सप्टेंबरपर्यत अत्यावश्यक सामान भरुन घ्यावे.

No comments

Powered by Blogger.