Header Ads

Karanja News today : bail plea accepted case by Adv Juned Khan

bail plea, court decision

सदोष मनुष्यवधाचे आरोपातील व्यक्तीस आज न्यायालयाने दिला जामीन 

प्रसिद्ध विधीतज्ञ जुनेद खान यांचा  युक्तीवाद 

कारंजा (का.प्र.) दि.०५ - हिट ऍन्ड रन प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेल्या १४ महिन्यापासून तुरुंगवासात असलेल्या आरोपीला जामीन मिळवून देण्याचा यथायोग्य असा युक्तीवाद प्रसिद्ध विधीतज्ञ ऍड. जुनेद खान यांनी केल्यामुळे आज सदरहू व्यक्तीस जामीन प्राप्त झाला. 
सलमान खान या अभिनेत्याच्या हिट अँड रन प्रकरणात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झाल्याचे प्रकरण एकेकाळी खुप गाजले होते. अशाच एका प्रकरणात कारंजा शहर पोलिस स्टेशन मध्ये दिनांक ०६/०७/२०१९ रोजी चे फिर्यादीनुसार समृध्दी महामार्ग कन्स्ट्रक्शन कार्यालयापासून काही अंतरावर एका टाटा झेनोन या वाहन चालकाने विना परवाना भरधाव वेगाने वाहन चालवून एकाचा मृत्यू घडवून आणला व दुसर्‍यास गंभीर जखमी केल्या बद्दल गुन्हा दाखल झाला होता.
सदर फिर्यादी नंतर अमित चमनलाल शर्मा यास पोलिसांनी आरोपी केले होते. तपासात आरोपी रक्ताच्या नमुन्यानुसार अपघातावेळी मद्याच्या अंमलाखाली होता, तसेच तो विना परवाना बेदरकारपणे वाहन चालवीत होता, व सदर वाहन लोकांनी जाळले असे समोर आले होते.
सदर आरोपी यास ०७/०७/२०१९ रोजी अटक करण्यात आली होती. व त्यावर  कलम २७९ ( निष्काळजीपणे भरधाव वाहन चालणे), ३०४ (हेतुपुरस्सर असलेला सदोष मनुष्यवध) व १८१(३) १८४ व १८५ मोटार वाहन कायद्यांतर्गत विनापरवाना बेदरकार वाहन चालविण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली होती. हा गुन्हा सिद्ध झाल्यास त्याला दहा वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.
या आरोपीचा पहिला जामीन अर्ज वि.न्यायालयाने फेटाळला होता, नंतर आरोपीकडून दुसरा जामीन अर्ज दोषारोप पत्र दाखल झाल्यानंतर वि.न्यायालयाने फेटाळला होता. तिसर्‍यांदा नंतर आरोपीकडून विद्यमान उच्च न्यायालय नागपूर येथे  अर्ज दाखल करण्यात आला, तो सुध्दा वि.उच्च न्यायालयात नामंजूर झाला. एवढेच नव्हे तर सदर आरोपीस जेल मध्ये ठेवून दीड वर्षात प्रकरण पूर्ण करण्याचे मा.उच्च न्यायालयाने आदेशित देखील केले होते. या नंतर आरोपीने कोविड १९ चा आधार घेऊन पुन्हा जामीन मिळण्यास विनंती केली, परंतु तो जामीन अर्ज सुध्दा विद्यमान न्यायालयाने फेटाळला.
अशा प्रकारे आरोपी चे चार वेळा जामीन अर्ज नामंजूर झाले नंतर आरोपी तर्फे ऍड. जुनेद खान यांनी जामीन अर्ज दाखल केला व त्यांचे युक्तिवादात विद्यमान न्यायालयाचे निदर्शनास अनेक बाबी आणून दिल्यात. यामध्ये या आरोपीस कथित घटनेचे वेळी अटकच करण्यात आली नव्हती व ज्या व्यक्तीस पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले होते त्याबद्दल त्याचे पोलिसांनी काय केले, याबद्दल उपलब्ध दस्तावरून स्पष्ट होत नाही. तसेच रक्ताचे नमुने सुध्दा या अमित शर्मा चे नसून दुसर्‍याच कुणाचे घेण्यात आल्याबद्दल व मेडिकल सर्टिफिकेट मध्ये फरक असले बाबत व कायदेशीर मार्गाचा व यासाठी असलेल्या प्रक्रियेचा अवलंब केला गेला नाही तसेच या व ईतर विशेष कायदेशीर व महत्वपूर्ण युक्तिवाद या प्रकरणात झाला तसेच मा.सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्याय निवाडे यांचे दाखले या प्रकरणात दाखल केले. 
विद्यमान न्यायालया समक्ष या आधी या बाबी मांडल्याच गेल्या नव्हत्या, त्यामुळे हा आरोपी जवळ पास १४ महिन्यापासून जेल मध्ये होता. आरोपी तर्फे  ऍड. जुनेद खान यांचे कडे सदर प्रकरण आल्यानंतर कोर्टात पहिल्यांदाच या बाबी आल्या व आरोपी तर्फे  ऍड. जुनेद खान यांचा हा  या प्रकरणात पहिला युक्तिवाद व न्यायनिर्णय लक्षात घेऊन विद्यमान जिल्हा व सत्र न्यायालय वाशिम जोड न्यायालय मंगरूळपीर यांनी आरोपी अमित शर्मा रा. जम्मू काश्मीर यास आज दिनांक ०५/०८/२०२० रोजी जामीन मंजूर केला.
ऍड. जुनेद खान यांनी दाखल केलेल्या या आव्हानात्मक जामीन अर्जाकडे प्रकरणाशी व न्यायालाशी संबधीत वर्गाचे लक्ष लागले होते. ऍड. जुनेद खान यांनी मिळवलेल्या या ऐतिहासिक व भविष्यात एका संदर्भाचा मान मिळवणार्‍या यशाबद्दल त्यांचे चाहत्यांनी आनंद व्यक्त केले व त्यांचे अभिनंदन केले आहे. 

No comments

Powered by Blogger.