Header Ads

Admission schedule of art courses announced : कला विषयक अभ्यासक्रमांचे प्रवेश वेळापत्रक जाहीर

Directorate of Art, Maharashtra State

Admission schedule of art courses announced

कला विषयक अभ्यासक्रमांचे प्रवेश वेळापत्रक जाहीर

          मुंबई (महासंवाद द्वारा) दि. 8 - कला संचालनालयामार्फत शैक्षणिक वर्ष 2020-21 करीता प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. प्रथम वर्ष पदविका / प्रमाणपत्र कला विषयक अभ्यासक्रम (मुलभूत अभ्यासक्रम, कला शिक्षक प्रशिक्षण आर्ट मास्टर) प्रवेशासाठीचे वेळापत्रक असणार आहे. विद्यार्थ्यांना वेळापत्रकानुसार http:///cetcell.net/doa/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावयाचे आहेत. विद्यार्थ्यांनी प्रवेशाचे दिलेले निकष, नियम प्रक्रिया आणि सूचना यांचे काळजीपूर्वक वाचन करावे. प्रवेशाचे निकष www.doa.org.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

         मुलभूत अभ्यासक्रम, कला शिक्षक प्रशिक्षण व आर्ट मास्टर या पदविका/प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेसाठी उमेदवाराद्वारे संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करणे, महाविद्यालय व अभ्यासक्रम निवडणे, कागदपत्रांच्या छायांप्रती (स्कॅन) अपलोड करणे यासाठी 9 ते 19 सप्टेंबर अशी मुदत देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी तात्पुरत्या निवड याद्या 22 सप्टेंबर रोजी प्रदर्शित करण्यात येणार आहेत. सर्व प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी तात्पुरत्या निवड यादीबाबत काही तक्रार असल्यास 23 सप्टेंबर रोजी सादर करता येतील. 24 सप्टेंबर रोजी विद्यार्थ्यांसाठी अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. संबंधित महाविद्यालयात दिनांक 25 ते 30 सप्टेंबर या कालावधीत प्रवेश घेता येणार असल्याचे कला संचालनालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

No comments

Powered by Blogger.