Header Ads

Adarsh Shikshak Puraskar to Mannan Railiwale : शे.मन्नान रायलीवाले यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

Mannan Railiwale

Adarsh Shikshak Puraskar announced to Mannan Railiwale

शे.मन्नान रायलीवाले यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

नोव्हेंबर मध्ये शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांच्या उपस्थितीत होणार पुरस्कार वितरण 

        कारंजा (का.प्र.) दि. ०७ - राज्यातील नगरपालिका व महानगरपालिका कार्यक्षेञात काम करणाऱ्या शिक्षकांचा उचित सन्मान व्हावा.यासाठी राज्य नगरपालिका व महानगरपालिका शिक्षक संघाच्या वतीने नगरपालिका व महानगरपालिका शिक्षकांना त्यांच्या कामात प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या गुणांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने शिक्षक दिनी देण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कार ५ सप्टेंबर रोजी जाहीर झाले असून, यामध्ये कारंजा नगर पालिका उर्दू कन्या शाळेचे मुख्याध्यापक शेख मन्नान रायलीवाले यांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
        शे.मन्नान यांनी शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक उपक्रमाची नियोजनबद्ध अमलबजावणी केली आहे तसेच कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारचे सकारात्मक कार्य करून लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याकरिता परिश्रम घेतले आहे. संपुर्ण राज्यातून ३०० पेक्षा जास्त शिक्षकांनी या पुरस्कारासाठी आपले प्रस्ताव शिक्षक संघाकडे पाठविले होते. सर्व प्रस्तावाची छाननी करून उत्कृष्टपणे कार्य करणाऱ्या २५ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार तर  २ शिक्षकांना प्रेरणा पुरस्कार व २५ शाळांना आदर्श शाळा पुरस्कार राज्याध्यक्ष अर्जुन कोळी,राज्य उपाध्यक्ष शिवाजी राजविडे,सरचिटणीस अरुण पवार,कार्याध्यक्ष संजय आवळे,महिला आघाडी प्रमुख साधना साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर करण्यात आले आहे. 
          कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्यामुळे  हे पुरस्कार या वर्षी शाळा सुरु झाल्या नंतर शिक्षण मंञी वर्षाताई गायकवाड यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे २०१९-२० मध्ये मुख्याध्यापक शेख मन्नान यांच्या शाळेला आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त झाला होता. 
          या पुरस्काराबद्दल मुख्याधिकारी, दादाराव डोल्हारकर, शिक्षण प्रशासन अधिकारी धनंजय डाखोरे,नगराध्यक्ष शेषराव ढोके, शिक्षण सभापती शाहीनबी ईकबाल हुसैन,राज्य कार्यकारिणी सदस्य प्रमिला गाठेकर,वाशिम जिल्हाध्यक्ष प्रेम भटकर संघटनेच्या तालुकाध्यक्षा अर्चना तोमर यांनी अभिनंदन केले आहे.

No comments

Powered by Blogger.