Header Ads

Vruddha Sahittik Kalawant Mandhan Yojana : हयातीचा दाखला पोस्टाने, ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन

वृद्ध कलावतांनी हयातीचा दाखला पोस्टाने, ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन

Vruddha Sahittik Kalawant Mandhan Yojana Antargat 

          वाशिम, दि. १४ (जिमाका) : महाराष्ट्र राज्यातील मान्यवर Vruddha Sahittik Kalawant Mandhan Yojana वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजनेंतर्गत कलावंतांना दरमहा मानधन त्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येते. याकरिता दरवर्षी दोनवेळा कलावंतांचा हयातीचा दाखला सांस्कृतिक कार्यालय संचालनालय यांच्याकडे सादर करावा लागतो. सध्या कोरोना विषाणू संसर्ग प्रादुर्भाव असल्याने सर्व मानधनधारक कलावंतांनी आपला हयातीचा दाखला पोस्टाने अथवा ऑनलाईन स्वरुपात सादर करावा, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
          कोरोना महामारीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कार्यालयात न येता पोस्टाने किंवा समाज कल्याण विभागाच्या dswozpwashim@gmail.com या ई-मेलवर अथवा ८२७५ २८३०२३ या व्हाटसअप क्रमांकावर मानधनधारक कलावंतांनी हयातीचा दाखला तत्काळ सादर करावा, जेणेकरून वरिष्ठ कार्यालयास माहिती देवून कलावंतांचे मानधन विनाविलंब देणे शक्य होईल, असे जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी अंबादास मानकर यांनी कळविले आहे. तसेच कलावंत मयत असतील तर संबंधितांनी त्यांच्या मृत्यू पत्राची माहिती सादर करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.