Header Ads

Washim Politechnic Admission Temporary Merit List

Politechnic Admission Temporary Merit List

Politechnic Admissions

तंत्रनिकेतन प्रवेशासाठी २४ व २५ सप्टेंबर रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर होणार

Politechnic Admission Temporary Merit List on 24th and 25th Sept

           वाशिम, दि. २१ (जिमाका) : महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत केंद्रीय पद्धतीने करण्यात येणाऱ्या विविध पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यासाठी १० ऑगस्ट पासून प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. सदर प्रवेश प्रक्रियेत पॉलिटेक्निक प्रथमवर्ष अभ्यासक्रमासाठी प्रवेश नोंदणीकरिता २१ सप्टेंबर व थेट द्वितीय वर्षासाठी २२ सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. नवीन वेळापत्रकानुसार प्रथम वर्षाची तात्पुरती गुणवत्ता यादी २४ सप्टेंबर रोजी, तर थेट द्वितीय वर्षाची तात्पुरती गुणवत्ता यादी २५ सप्टेंबर रोजी जाहीर केली जाणार आहे.

         प्रथम वर्षाकरिता २५ ते २७ सप्टेंबर पर्यंत आवश्यक कागदपत्रे, राखीव जागेसाठी असलेली कागदपत्रे तसेच विद्यार्थ्यांच्या तक्रारी लक्षात घेवून दुरुस्त्या केल्या जातील. तसेच थेट द्वितीय वर्षाकरिता २६ ते २८ सप्टेंबर या कालावधीत दुरुस्त्या केल्या जातील. २९ सप्टेंबर रोजी प्रथम वर्षाची व ३० सप्टेंबर रोजी थेट द्वितीय वर्षाची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. वाशिम शासकीय तंत्रनिकेतन येथे प्रवेशप्रक्रिया व विविध शाखांची माहिती व महत्व तसेच आवश्यक कागदपत्रांची माहिती देण्यासाठी समुपदेशन कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे, असे शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य यांनी कळविले आहे.

No comments

Powered by Blogger.