Header Ads

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

 
Washim district Map

विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

वाशिम, दि. २५ (जिमाका) : राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार वाशिम जिल्ह्यात १ जानेवारी २०२० या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. त्यानुसार ३३-रिसोड, ३४-वाशिम व ३५ कारंजा या विधानसभा मतदार संघाची अंतिम मतदार यादी आज, २५ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अंतिम मतदार यादीनुसार ३३-रिसोड विधानसभा मतदार संघात १ लक्ष ६२ हजार ६२४ पुरुष, १ लक्ष ४६ हजार ९१६ महिला, ३ तृतीयपंथी असे एकूण ३ लक्ष ९ हजार ५४३ मतदार आहेत. तसेच ३४- वाशिम विधानसभा मतदारसंघात १ लक्ष ८१ हजार ९७७ पुरुष, १ लक्ष ६७ हजार १७३ महिला आणि १ तृतीयपंथी असे एकूण ३ लक्ष ४९ हजार १५१ मतदार, तर ३५- कारंजा विधानसभा मतदारसंघात १ लक्ष ५७ हजार ६५ पुरुष, १ लक्ष ४५ हजार ११५ महिला आणि ६ तृतीयपंथी असे एकूण ३ लक्ष २ हजार १८६ मतदार आहेत. जिल्ह्यात एकूण ५ लक्ष १ हजार ६६६ पुरुष, ४ लक्ष ५९ हजार २०४ महिला आणि १० तृतीयपंथी अशा एकूण ९ लक्ष ६० हजार ८८० मतदारांचा अंतिम मतदार यादीमध्ये समावेश आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय, तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तसेच गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयातील नोटीस बोर्डवर तसेच सर्व मतदान केंद्रांवर मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजन यांनी कळविले आहे.

No comments

Powered by Blogger.