Header Ads

कारंजातील पत्रकारांचे आरोग्यमंत्र्यांना एसएमएस पाठवून आंदोलन

 


कारंजातील पत्रकारांचे आरोग्यमंत्र्यांना एसएमएस पाठवून आंदोलन 

आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या त्या पत्रकारांच्या मृत्यूची चौकशी व इतर मागण्याची पुर्तता करा 

तहसिलदारांचे मार्फत पाठविले मुख्यमंत्र्यांना निवेदन 

          कारंजा (जनता परिषद) दि.१८ - कोरोना काळात आरोग्यविभागाच्या ढिसाळ कार्यभारामुळे मृत्यूमुखी पडलेल्या पत्रकार बांधवांच्या मृत्यूची चौकशी करण्यात यावी, पत्रकारांसाठी ५० लाख रुपयांची विमा सुरक्षा देण्यात यावी तसेच त्यांचेसाठी कोविड रुग्णालयांमध्ये बेड राखीव ठेवण्यात यावेत, अशी मागणी करणारे निवेदन राज्याचे मुख्यमंत्र्यांना तहसिलदार यांचेमार्फत पाठविण्यात आले. कारंजातील पत्रकारांचे शिष्टमंडळाने हे निवेदन आज दिनांक १८ सप्टेंबर रोजी तहसिलदार धिरज मांजरे यांना दिले. 

आरोग्यमंत्र्यांना एसएमएस पाठवून आंदोलन

          कोरोना महामारीचे संकटाचे काळात वार्तांकन करतांना पत्रकार पांडुरंग रायकर व संतोष पवार या पत्रकारांना वेळेवर रुग्णवाहिका व बेड न मिळाल्यामुळे उपचार अभावी त्यांचा दुर्देर्वी मृत्यू झाला. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाची ढिसाळ कारभाराची हि परिसिमाच होय. आज कारंजा तालुक्यातील पत्रकारांचे वतीने याचा तीव्र निषेध करण्यात आला. पत्रकारांचे मृत्यूची चौकशी करण्यात यावी तसेच आपल्या मागण्यांची पुर्तता ही करण्यात यावी यासाठी पत्रकार बांधवांनी आज राज्याचे आरोग्यमंत्र्यांना एस.एम.एस पाठवून आंदोलन केले. 

           कोरोनाचे महामारीत लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ओळख असलेल्या पत्रकार क्षेत्रातील पत्रकार रायकर व पवार यांच्या दुर्दैवी मृत्यूस केवळ व केवळ शासकीय यंत्रणाच कारणीभूत आहे. हि वेळ इतर पत्रकारांवर येऊ नये यासाठी शासनाने कोविड-१९ च्या महामारीत कारंजा तालुक्यातील व राज्यातील पत्रकारांसोबत असे घडल्यास त्यांचे परिवाराला किमान ५० लाखांचा विमा देण्यात यावा तसेच पत्रकारांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांचेसाठी कोविट सेंटरमध्ये बेड राखीव ठेवण्यात यावेत, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. 

          निवेदन देतांना गोपाल पाटील भोयर, विजय काळे, विजय भड, प्रफुल्ल बाणगांवकर, आरिफ पोपटे, अभय खेडकर, महेंद्र गुप्ता, दिपक पवार, छगन वाघमारे, मनिष भेलांडे, प्रा.शेख सर, धनंजय राठोड, फिरोज शेकुवाले, संजय कडोळेे, समीर देशपांडे, अमोल अघम, अमोल लोणकर हे पत्रकार बांधव उपस्थित होते. 

No comments

Powered by Blogger.