Header Ads

washim news today 13 Aug : पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा वाशिम जिल्हा दौरा

Guardian Minister Shambhuraj Desai to Visit Washim

पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा १४ व १५ ऑगस्ट रोजी  वाशिम जिल्हा दौरा  

  • कारंजा येथील उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाचे करणार उद्घाटन
  • स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयावर ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थिती
  • नियोजन भवनात विविध शासकीय बैठकींना उपस्थिती  

           वाशिम, दि.१३ - गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज शिवाजीराव देसाई हे १४ व १५ ऑगस्ट रोजी वाशिम जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. 
    त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
              पालकमंत्री श्री. देसाई यांचे १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वा. कारंजा येथे आगमन होईल. येथील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाच्या उद्घाटन समारंभास ते उपस्थित राहतील. सायंकाळी ७ वा. वाशिम शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम.
              भारतीय स्वातंत्र्याच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९.०५ वा. जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात आयोजित मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास पालकमंत्री श्री. देसाई उपस्थित राहतील. त्यानंतर सकाळी १० ते १२ वा. दरम्यान जिल्हा नियोजन भवन येथे आयोजित विविध शासकीय बैठकांना उपस्थित राहतील. दुपारी १ ते २ वाजेपर्यंत वाशिम शासकीय विश्रामगृह येथे महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी यांच्यासाठी राखीव. दुपारी २ वा. शासकीय वाहनाने जालनाकडे प्रयाण करतील.

    No comments

    Powered by Blogger.